शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घ्यावा : नागरीकांची मागणी


म्हसळा ( निकेश कोकचा)

म्हसळा शहराची वाढती वसाहत व अरुंद रस्त्यांमुळे शहरातील नागरीकांना प्रत्येक १५ ते २० मिनिटानंतर वाहतूक कोंडीसारख्या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात होणाऱ्या वारंवार वाहतूक कोंडीतून नागरीकांची सुटका करण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घेण्याची मागणी शहरातील नागरीक करीत आहेत.

सोमवार दिनांक २४ जुन रोजी म्हसळा नगरपंचायतीची सर्वसाधारण आहे. या सभेमध्ये सर्व नगरसेवकांनी चर्चा करुण शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा अशी मागणी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी योगेश करडे यांच्यासहीत शहरातील नागरीक करित आहेत. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी सभेमध्ये नगरपंचायती समोर दोन पर्यायांवर विचार करणे अपेक्षित आहे. यामध्ये  मुख्य रस्त्याच्या दोन्ही  बाजुला असणारे बांधकाम सर्वसंमतीने १ ते २ मिटर तोडण अपेक्षीत आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे शहरातून होणारी एस.टी. बस व मोठया वाहनांच्या प्रवासाला पर्यायी म्हसळा बायपास ने वळवून मोठया वाहनांसाठी शहरातील रस्तावर एकेरी वाहतूक ( वन वे ) साठी प्रयत्न करणे हा आहे. सोमवारी होणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरसेवक शहरात होणाऱ्या वारंवार वाहतूक कोंडीतून शहरातील नागरीकांची सुटका करण्यासाठी चर्चा करतात की, नाही याकडे सर्व शहरातील ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.

म्हसळा शहरामध्ये वाहतूककोंडीची  समस्या  एखादया भयंकर  रोगापेक्षाही जलद प्रमाणात वाढत आहे. शहरातून तब्बल २८८ एसटी बस दिवसाखेर म्हसळा शहरातून ये जा करतात. या एसटी बस ना शहरामध्ये येण्या अथवा शहरातून जाण्यासाठी एकेरी रस्ता ( वन वे ) व्हावा ही मागणी आता  नगरपंचायतीने करण्याची वेळ आली आहे. -योगश करडे, प्रतिष्ठीत व्यापारी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा