जयसिंग बेटकर : प्रतिनिधी म्हसळा
२२ जुन २०१९ रोजी म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरसई व न्यू इंग्लिश स्कुल खरसई या शाळेतील २५० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, पेन वाटप करण्यात आल्या. गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रिडा इ. क्षेत्रात विजय हनुमान क्रिडा मंडळ खरसई यांचे कार्य चालू आहे. त्यांच्यातर्फे या परिसरात येणाऱ्या शाळा, अंगणवाडी, हायस्कूल यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. या कार्यक्रमासाठी म्हसळा तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ. छायाताई म्हात्रे, शा. व्य. समिती अध्यक्ष निलेश मांदाडकर, उपाध्यक्ष जगदीश खोत, विजय हनुमान क्रिडा मंडळाचे संस्था प्रमुख बाळाराम पयेर, अध्यक्ष कमळेश खोत, उपाध्यक्ष चंद्रकांत शितकर, सचिव लक्ष्मण मांदारे, कार्याध्यक्ष रामचंद्र मांदारे, उपसचिव सदानंद पयेर, खजिनदार लक्ष्मण कांबळे, उपखजिनदार महेश शितकर, स्थानिक अध्यक्ष नामदेव खोत, उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, स्था. कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, सल्लागार अानंद उपकारे, क्रिडा प्रमुख नरेश कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक दिनेश रांगळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक मुलानी सर, उपशिक्षक बाळाजी राठोड, बाळाजी मडावी, अशोक सानप, अनिल गाडेकर, सातपुते सर, काटे सर, पाटील सर, शाळा समिती सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
विजय हनुमान क्रिडा मंडळाबाबत संस्थेच्या कार्य मंडळाचे सचिव लक्ष्मण मांदारे व अध्यक्ष कमळेश खोत यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी म्हसळा पंचायत समितीच्या सभापती यांनी मनोगतात सांगितले की, विजय हनुमान क्रिडा मंडळाचे शैक्षणिक साहित्य वाटप स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि गेली अनेक वर्ष हे भरीव कार्य करीत आहेत. या परिसरातील अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत आहेत. आणि समाजोपयोगी चांगले कार्य करीत आहेत. त्याबद्दल सभापती मॅडम यांनी क्रिडा मंडळाबाबत गौरवशाली उद्गार काढले.
शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदारे यांनी सांगितले की, "आज प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल विजय हनुमान क्रिडा मंडळाचे अभिनंदन केले. आज खरसई शाळेतून शिकणारे विद्यार्थी जिल्हा, राज्य पातळीवर विविध क्षेत्रात चांगले योगदान देत आहेत. अशावेळी ते श्रेय शिक्षक, ग्रामस्थ, पालक व अशा सामाजिक संस्था क्रिडा मंडळाचे खुप मोठे सहकार्य असते", असे ते म्हणाले. तसेच इतरही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय हनुमान क्रिडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षणप्रेमी यांचे सहकार्य व उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे खजिनदार लक्ष्मण कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक रांगळे सर यांनी केले.


Post a Comment