संजय खांबेटे :म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा -श्रीवर्धन तालुक्यातील सामाजिक संस्थांपैकी आग्रेसर असलेल्या १८ गाव आगरी समाज अध्यक्षपदी गोंडघरचे संतोष पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडी मध्ये उपाध्यक्ष संतोष रामा नाक्ती,सेक्रेटरी.रामचंद्र म्हात्रे. सह सेक्रेटरी ऋषीकेष गायकर,खजिनदार भालचंद्र गाणेकर, सल्लागार.महादेव पाटील,परशुराम मांदाडकर ,रत्नाकर पाटील अनंत धनावडे,विष्णू धुमाळ,हिशोब तपासनीस नथुराम कमळाकर खोत अशी नवीन कार्यकारणीची ३ वर्षाचे कालावधीसाठी निवड झाली आहे..
समाजाचे मावळते अध्यक्ष महादेव पाटील यांच्या सुमारे २० वर्षाचे कारकीर्दीबाबत झालेले चढउतार व सकारात्मक कामाबाबत अनंत धनावडे, परशुराम मांदाडकर, नथुराम खोत, विष्णु धुमाळ, विजय पांडव, संतोष भायदे, दिलीप नाक्ती, चंद्रकांत बिराडी, चंद्रकांत भगत, पांडुरंग खोत, रमेश कांबळे, रत्नाकर पाटील, रामचंद्र म्हात्रे, मधु पाटील, संतोष नाक्ती, भालचंद्र गाणेकर ऋषीकेष गाणेकर, कृष्णा पाटील, धोंडू पाटील, चंद्रकांत बेडेकर, महादेव नाक्ती, नथुराम खोत, कोकाटे, नाना मोहीते, संतोष पाटील, प्रकाश गाणेकर आदीनी मनोगत व्यक्त केले.
"१९९९ साली १८ गाव आगरी समाज अध्यक्षपद समाजाने हाती दिल्यावर प्रथमतः समाजातील सर्व गटा-तटात समेट घडवून समाजाची ज्ञानदान कमेटी स्थापन करुन समाजात पारदर्शक वातावरण केले. समाजाचे इमारतीचे लोकार्पण सोहळ्यात स्पष्ट केल्याने नव्याने कार्यकारणी होत आहे. कारकीर्दीतील २० वर्षात सुमारे १ कोटीची इमारत, मेंदडी , म्हसळा येथे पतसंस्थेची जागा असे सर्वांच्या सहकार्याने उभ केले आहे.
- महादेव पाटील, माजी अध्यक्ष, १८ गाव आगरी समाज

Post a Comment