प्रतिनिधी- महादेव म्हात्रे
१७ जुन २०१९ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा चिखलप आदिवासी वाडी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी गावच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. उपस्थित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित समितीचे पदाधिकारी व पालक यांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक मनोहर जाधव, लाल्या जाधव, लक्ष्मण पवार, संतोष पवार, सुरेश पवार, माजी सरपंच हर्षदा जाधव, निर्जना पवार, सुरेश पवार, अशोक पवार, संतोष मुकणे आणि इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप शिंदे यांनी केले.

Post a Comment