म्हसळयातील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस स्वागतोत्सवानी साजरा
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज सोमवार (१७ जून) शाळा सुरू झाली. नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाला , शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली . मागील वर्षीप्रमाणे यंदाही न्यू इंग्लीश स्कुल म्हसळाचे प्राचार्य माळी व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन स्वागत केले. यावेळी जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्राचार्य बाळासाहेब माळी, पर्यवेक्षक महामुलकर सर,मंगेश कदम , दीपक सूर्यवंशी, सचिन गायकवाड, खोकले सर , पाडियार सर, गोसावी सर, कामडी सर, वसावेसर, सहारेसर, पालक वर्ग पांडुरंग कुवारे, शंकर फटकरे, मोहन महाडिक, सौ कल्पना कांबळे, रेश्मा म्हात्रे, प्रभावती कांबळे, निलम कांबळे, सविता चव्हाण, पसंती चव्हाण, विनिता अबगूल यावेळी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. प्राचार्य माळी यानी नवीन विद्यार्थ्यांचे बरोबरीने शाळेतील अन्य विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचा १०वी व १२ वी. चा निकाल, स्कॉलरशीपचा निकाल, नव्याने सुरु होत असलेली आययावत अटल लॅब बाबत माहीती संपुर्ण तालुक्यात व पंचक्रोशीत गेली असल्याने आपल्या शाळेंत नव्याने अॅडमीशन वाढत असल्याचे सांगितले.
फोटो - प्राचार्य माळी व उपस्थित मान्यवर विखार्थाना पुस्तक संच देत असताना.


Post a Comment