अणिबाणीच्या काळात जेल भोगणाऱ्या प्रकाश निजामपूर यांचा म्हसळा तहसिल कार्यालया तर्फे धनादेश देऊन गौरव


म्हसळा (निकेश कोकचा )

सन  १९७५ ते १९७७ या कालावधीत देशात आणिबाणी घोषीत करण्यात आली होती. या दोन वर्षाच्या कालावधी मध्ये लोकशाही वाचवण्यासाठी लढा देताना जेल भोगणाऱ्यांना आर्थिक मदत देऊन सरकार सन्मान करीत आहे. या अनुषंघाने म्हसळा तहसिल कार्यालयामार्फत  प्रकाश शंकर निजामपूरकर यांना धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ पर्यंत तब्बल २१ महिने देशात आणिबाणी घोषीत करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान  इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांनी संविधानमधिल कलम ३५२ अंतर्गत आणिबाणीची घोषणा केली होती. या आणिबाणीच्या काळात रायगड जिल्हातील २० व्यक्तींना अटक करण्यात आली होती, यामध्ये म्हसळा येथिल प्रकाश शंकर निजामपूरकर यांचा देखील समावेश होता. निजामपूरकर यांना पहिले यरवडा जेलमध्ये, नंतर विसापूर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. निजामपूरकर यांनी लोकशाही वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्यामुळे त्यांना शासनातर्फ दर माह पाच हजार रुपये पेंशन सुरु केली असून  १ जाने २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील फरकाचे ७५ हजार रूपयांचा धनादेश सोमवारी तहसिल कार्यालयामध्ये त्यांना देण्यात आला. यावेळे समन्वय समितीचे अध्यक्ष शैलेष पटेल,तहसिलदार शरद गोसावी, नायाब तहसिलदार के.टी. भिंगारे, तुकाराम पाटील, कर्मचारी विशाल भालेकर, सरिता लिमकर हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा