संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा येथील ट्रॅफीक जॅमची समस्या ही आता सोडविण्या पलीकडची झालेली आहे , याला नगरपंचायत व पोलीस प्रशासन जास्त जबाबदार आहे असे नागरिकांचे मत आहे. शहरातील स्थानिक पादचारी, जेष्ठ नागरिक , महीला वर्ग या सर्वाना दिवसें दिवस शहरांतील मुख्य रस्त्यावर व बाजारांत चालणेही दुरापास्त झाले आहे.
श्रीवर्धन, श्री क्षेत्र हरीहरेश्वर, दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिघीबंदर, तुरूंबाडी येथील दास प्रकल्प येथे जाणारी सर्व व्यापारी व पर्यटकांची वाहने म्हसळा शहरांतील रस्ता वापरणे पसंत करतात , G. P. S. प्रणालीही याच मार्गाबाबत मार्गदर्शन करते. अधीच अरूंद असलेले म्हसळा शहरांतीत रस्ते सातत्याने वाढणाऱ्या
वाहातुकी मुळे सतत ट्रॅफीक जॅमच्या समस्येत आडकत आहे. म्हसळा बाजारपेठ २० वर्षापूर्वी केवळ ५०० मीटरच्या मुख्य रस्त्यावर व २०० मीटर अंर्तगत रस्त्यांवर होती.आता मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ ही सावर फाटा ते दिघी नाका, दिघी नाका ते सकलप फाटा आणि दिघी नाका ते ताज बेकरी असे तब्बल ४ कि.मी. व अर्तगत बाजारपेठेची कक्षासुध्दा त्याच पटीने वाढली आहे. तेवढयाच संखेने फेरीवाले, प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा त्यांचे स्टँड( थांबे), माल वाहतुकीची साधने यांच्या संखेत प्रचंड वाढ झाली आहे. याच बरोबर अनधिकृत पार्कींग, मोकाट गुरे व कु त्र्यांचा त्रास होत आहे. ह्या सर्वांचा ताण ट्रॅफीक जॅम वर होत आहे.
नागरिकाना नगर पंचायतीकडून ट्रॅफीक जॅम सोडविण्याच्या काय आहेत अपेक्षा
१)म्हसळा नगरपंचायतीने टू व्हिलर पार्कींग ची सुविधा सुरु करावी
२) प्रवासी वाहतुकीचे थांबे व वाहनांची संख्या निश्चित करावी
३)अनधिकृत टपरी व हातगाडी वाल्याना योग्य जागा देणे
४) अंर्तगत रस्त्यांचा छोटया वाहनांसाठी वापरा बाबत अभ्य
५) मोकाट गुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे काळात असणारा कोंडवाडा कार्यरत व्हावा.
पोलीस प्रशासना कडून नागरिकांच्या अपेक्षा
१ ) सध्या शहरांत ट्रॅफीक पोलीस दोन कार्यरत आहेत ते किमान चार असावे.
२) वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन व्हावे
३) एस्.टी. च्या लांब पल्लाचे बसेसची एकेरी वाहतुकीचा पर्याय आभ्यासावा व चाचपणी करावी.
" अनेक वेळा पोलीस स्टेशनच्या जवळपास ट्रॅफीक जॅमची घटना अनेक वेळा होते, आशा वेळी रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या अगर पोलीस स्टेशनच्या व्हरांड्यात उभा असलेल्या पोलीसानी कार्यरत होणे गरजेचे आहे परंतु अनेक वेळा ती मंडळी कर्तव्यांत कसूर करतात"
-महादेव पाटील, माजी सभापती पं.स.म्हसळा.
"म्हसळा शहरांतील वाहतुक कोंडींवर पर्याय म्हणून केवळ एस.टी. ला.एकदीशा मार्गाचा अवलंब हे सर्वांत गरीब , सर्वसामान्य प्रवाशांसाठी अन्यायकारक ठरेल त्यामुळे हा निर्णय एस.टी. प्रशासन स्विकारणार नाही.
श्रीमती गाडेकर , डेपो मॅनेजर , श्रीवर्धन.


Post a Comment