श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यामध्ये आभाळ ढगाळ झाले होते . कित्येक दिवस उष्म्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिक हे हैराण झाले होते . त्यामुळे सकाळपासून श्रीवर्धन शहरामध्ये मंदमंद वारा वाहत असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना सुखद आनंद मिळत होता . परंतु दुपारनंतर मात्र , वादळी वा - याने वेग वाढवला त्यामुळे काही ठिकाणच्या समुद्र लगत असणा - या घरांचे पत्रे उडालेली तर काही घराची कौले उडाली . त्याच बरोबर श्रीवर्धन जीवनाबंदर येथील एक विद्युत पोल कोलमडला , तसेच दांडा येथील स्मशानभूमी जवळील तीन ते चार विद्युत पोल कोलमडले आहेत . वादळी वा - याने समुद्राने आपले रौद्ररुप धारण केले आहे , सोसाट्याचा वारा आणि समुद्रामध्ये सुरु असलेला वादळ यामुळे भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटाचे पाणी समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या गावांमध्ये शिरून मोटी जिवितहानी होवू शकते . शेतामध्ये खारे पाणी शिरल्याने शेतकरी बांधवांना सुद्धा नुकसान सोसावे लागणार आहे . या वादळामुळे समुद्राच्या किनारी असलेली गावे सुद्धा धास्तावली आहेत . भरतीच्या वेळी वायासोबत लाटाचे तांडव पहायला मिळत असतात . मात्र गेले दोनतीन दिवस काही वेळा पाऊस संथधार तर काही वेळा जास्तच पाऊस पडत आहे . जुन , जुलै हे २ महिने शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये मच्छीमारी बंद केलेली असते . जून महिन्यामध्ये वादळाने सुरूवात केली असल्याने , मच्छीमारी सिझनमध्ये मासेमारीला पुरक वातावरण असेल असे बुजुर्ग मच्छीमारांकडून बोलले जात आहे .

Post a Comment