झेडपीच्या अधिकृत वेबसाईटवर श्रीवर्धन वाळीत ; पर्यटनस्थळांची ओळख दर्शवणाऱ्या रकान्यात श्रीवर्धनचा उल्लेखच नाही
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्ह्याची ओळख करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिकृत वेब साईट वापरतात. दक्षिण रायगडमधील सुपरिचित व ऐतिहासिक तालुका असलेल्या श्रीवर्धन तालुक्याचा विसर जिल्हा परिषदेला पडला आहे . ३. ५० ते ४ किमीचा विस्तीर्ण , स्वच्छ किनारा श्रीवर्धनला लाभला आहे . श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे दक्षिण काशी नावे प्रसिद्ध आहे . श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन शहर , दिवेआगर , आदगाव , खाडी हे समुद्र किनारे पर्यटकांचे आवडीचे आहेत . श्रीवर्धन बीच सुशोभीकरण , पथदिवे , अंतर्गत रस्ते आदी कामे , हरिहरेश्वर येथे देवस्थान लगतचा प्रदक्षिणा मार्ग , दिवेआगर येथे रुपनारायण मंदिर , रस्ते अशी कामे पूर्ण झाली आहेत . तालुक्यातील पर्यटन आणि त्याअनुषंगाने पर्यटनावर आधारित पूरक लघु उद्योग वाढीस लागावा ह्यासाठी विविध योजना कार्यान्वयीत करण्यात येत आहेत . रायगड जिल्हा परिषदेला या सगळ्या बाबींचा विसर वेबसाईटर माहिती देताना पड़ल्याचे दिसत आहे . जिल्हा परिषदेच्या देवस्थान मंदिरे , बीच समुद्रकिनारे पर्यटन स्थळे आदींची माहिती देणा - या रकान्यात श्रीवर्धन तालुक्याची उन्लेखच केलेला नाही . अटकेपार झेंडा ही व्याख्या ज्यांच्या पराक्रमाने मराठीत निर्माण झाली आणि ५ पिढ्या हिंदवी साम्राज्य उभारणीसाठी खर्च केलेले पेशवे घराणे हे श्रीवर्धनचेच आहेत . पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे स्मारक श्रीवर्धन शहरात असून असंख्य नागरिक या ठिकाणी भेट देतात . सदर माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईट असावी अशी तालुक्यातील नागरिकांची रास्त अपेक्षा आहे . जिल्हापरिषदेच्या संबंधित खात्याचे लोक श्रीवर्धन तालुक्यावाबत अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे . नामोल्लेखच नसल्याने श्रीवर्धन तालुका जन्मभूमी असणारे सर्व नागरिक नाराज आहेत .

Post a Comment