कोकणातील जलविद्युत केंद्र बंद करण्याचा सरकारचा घाट खा. सुनील तटकरे यांचा आरोप ; हरकत घेण्याचा इशारा



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
कोकणातील जलविद्युत केंद्र बंद करण्याचा घाट सरकार घालत असल्याचा आरोप करित सरकारचा डाव उधळून लावण्याचा इशारा देखील खा. सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कडेकपारात पडणारे पाणी नद्यांच्या माध्यमातून कोकण परिसरात येत असते . याच्यामध्ये कोयना , मुळशी , टाटा जलविद्युत प्रकल्प आहेत . हे पाणी पूर्वेकडे नेण्यासाठी कोकणातील विद्युतनिर्मितीसाठी लागणारे पाणी , सिंचनासाठी लागणारे पाणी पिण्यासाठी लागणारे पाणी. हे पाणी आम्हाला उपलब्ध ठेवूनच या पाण्याच्याबाबतीत निर्णय घेतला गेला पाहिजे . किंवा पाण्याचे अन्य स्तोत्र  पहिल्यांदा उभे केले पाहिजेत. ज्याच्याकडून आज कोकणात जेवढे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांना भागविले जाते. तसेच जुने विद्युत प्रकल्प बंद करुन विद्युत निर्मिती बंद करण्याचा प्रयत्न केला . जात असेल तर ते चुकीचे आहे . कोकणाला लागणारे पाणी कोकणाला पुर्णपणे मिळालेच पाहिजे आणि मग ते अतिरिक्त ठरतेय असे कागदावर आम्हाला सांगीतल्यानंतर ते अन्य ठिकाणी वळविण्याच्या दृष्टीकोनातून आमची हरकत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले , या संदर्भात पूर्ण माहिती घेतली अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांना जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांना भेटून यासंदभात चर्चा करण्यात येणार आहे . उपलब्ध पाण्यातून वशिष्टी , अंबा , कुंडलिका , सावित्रीचे पाणी कुठल्याही परिस्थीत तिकडे न वळविता उपलब्ध असणार्या पाण्यामधून रत्नागिरी , रायगडसाठी पिण्याचे पाण्याची गरज वाढत्या नागरिकीकरणासाठी लागणारे पाणी . सिंचनाचे पाणी , दुवार शेती प्रकल्पांना लागणारे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे . तसेच हे पाणी वळविले जात असताना ब्रिटीश काळापासून भिरा , भिवपुरी येथे जलविद्युत निमित बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा