निरोगी शरीरासाठी नियमित योगासने आवश्यक ....डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आज आधुनिक जीवनशैली मुळे आरोग्या कडे कळत नकळत दुर्लक्ष होत आहे .त्याचा परिणाम दूरगामी असून भावी काळासाठी धोकादायक आहे .योगाभ्यास ही आपल्या शरीराची गरज असून मानसिक स्वास्थ्यासाठी नितांत आवश्यक आहे असे प्रतिपादन नितीन प्रभू तेंडुलकर यांनी केले एस एन डी टी महाविद्यालायकडून मुंबई विभागातील सर्व महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले श्रीवर्धन मधील महर्षी कर्वे कॉलेज मध्ये योगाभ्यासाचे महत्व तेंडुलकर यांनी मांडले . आधुनिक जीवनशैलीत योगा चे महत्व विशद करत असताना तेंडुलकर यांनी सांगितले आजमितीस हवेमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे त्या कारणे विविध श्वसनाचे आजार उदभवत आहेत आजच युग हे स्पर्धेचं युग आहे त्यामुळे कळत नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे जुन्या काळात सर्वसामान्य व्यक्ती कष्टाचे काम करत असत परंतु आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे कष्टाचे प्रमाण कमी झाले आहे दिवसंदिवस माणूस आळशी बनत आहे पर्यायाने लठ्ठपणात वाढ होत आहे . मोबाईलच्या अति वापरामुळे मानसिक स्वास्थ्याशी निगडित आजारांमध्ये वाढ होत आहे असे तेंडुलकर म्हंटले. विद्यार्थिनीच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना तेंडुलकर यांनी मुक्त पणे विद्यार्थिनीशी संवाद साधला. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या महिलांच्या समस्या , घर , नोकरी व स्वप्ने यांचा मेळ घालत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास गरजेचं आहे असे तेंडुलकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रम प्रसंगी बाबूलाल जैन यांनी विद्यार्थिनींना योगाचे धडे दिले सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक अनिल वाणी,शिक्षिका तृप्ती विचारे, अक्षता तोडणकर, करिश्मा चोगले , दिनेश भुसाणे, केदार जोशी आदी उपस्थित होते .


Post a Comment