म्हसळा(निकेश कोकचा)
डिजीटल इंडीया अंतर्गत सर्व नागरीकांना बॅकमध्ये खाते उघडण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या आवाहनाला राष्ट्रीकृत बॅक ऑफ इंडीया अपवाद ठरताना दिसत असून कर्जदारांनी कर्ज फेडला नाही म्हणून मॅनेजरने थेट बँकेला टाळे ठोकल्याची घटना घडली आहे.
ग्रामिण भागातील नागरीकांना सुविधा मिळावी या हेतूने म्हसळा तालुक्यातील पांगलोली गावामध्ये अनेक वर्षापासून बॅक ऑफ इंडियाची शाखा कार्यरत आहे.या बॅकेचा परिसरातील ५ गाव व वाडयां मधिल नागरीकांना लाभ होत होता. बॅकेमध्ये ४ हजार ७०० खातेदार असून तब्बल ११ ते १२ कोटींचा डिपॉझीट जमा आहे. मात्र बॅकेचे ६० लाखाच्या जवळपास कर्ज थकल्याने सदर बॅंक बंद करण्याचा निर्णय झोनल बॅकेने घेतला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पांगलोली येथिल बॅक ऑफ इंडीया २९ एप्रिल पासून बंद आहे. सदर बॅक बंद झाल्याने आपल्या दैनंदिन बॅक व्यवहारासाठी गावातील शाळकरी मुले, वृद्ध पेंशनधारक व गरोदर महिलांना २० ते २५ किलोमिटर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन व्यवहार करावे लागत आहे. ग्रामिण भागातील नागरीकांना बँक व्यवहारासाठी करावी लागणारी पायपिट पाहता बॅक पुन्हा सुरु करावी व बँकेकडून झालेल्या कर्जवाटप प्रकरणाच्या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थाकडून पुढे येत आहे

Post a Comment