म्हसळा (बाबू शिर्के)
म्हसळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राम मंदिरात चोरट्यानी दानपेटी फोडून त्यातील सुमारे 15 हजाराची रक्कम चोरून नेल्याची घटना दिनाक 29 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि म्हसळा शहरात रहदारीच्या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात रोज प्रमाणे शनिवारी सकाळी त्या मंदिरातील पुजारी पूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिरातील दानपेटी फुटलेली निदर्शनात आली. चोरट्याने मंदिराला लागून असलेल्या तांबट समाजमंदिराचा आतील आणी बाहेरील कुलूप फोडून मंदिरात प्रवेश केला आणी मंदिराची दानपेटी फोडून त्यातील अंदाजे रोख रकम 15000 रुपये चोरून नेले. या बाबत म्हसळा पोलीस स्टेशनला हिंदू समाजाचे खजिनदार योगेश करडे यांनी म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद केली आहे.

Post a Comment