म्हसळा शहरातील राजीप उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात



म्हसळा शहरातील राजीप उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात : नविन इमारतीला ताब्यात घेण्याआधीच लागती गळती :कामाच्या चौकशीची मागणी

निकेश कोकचा : म्हसळा ( प्रतिनिधी )
म्हसळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे नव्याने केलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. केलेले बांधकाम  शाळेसाठी ताब्यात घेण्या आधीच इमारतील गळती लागली असून या शाळेत शिकणाऱ्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्याना एका चाळीतील छोट्याशा खोलीत आपले शिक्षण पुर्ण करावे लागत असल्याने त्यांचे भविष्य ठेकेदार व जि.प.च्या बांधकाम अभियंताने हेतूस्पर अंधारात घातले आहे.
सर्व शिक्षण अभियान अंतर्गत २४ ऑक्टोंबर २०१६ रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या पत्रानूसार जिल्हा परिषदेच्या धोकादायक व  मोडकीस आलेल्या वर्गखोल्या व इमारती बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली होती. या मंजुरी मध्ये म्हसळा शहरातील उर्दू शाळेचाही समावेश होता. २०१६ पासून सुरू असलेल्या म्हसळा शहरातील ऊर्दू शाळेच्या इमारतीचे / वर्गखोल्यांचे बांधकाम नियमा नूसार २०१७ पर्यंत पुर्ण झाले पाहिजे होते. मात्र २०१९ उजडून सहा महिने अधिक झाले असले तरीही या शाळेची इमारत अपुर्ण आहे. व्यवस्थापन समितीने शाळा ताब्यात घेण्याआधिच शाळले गळती लागली असून, भिंतीना भेगा पडल्या असुन संपुर्ण इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. चालू वर्षात या शाळेत पाहिली ते चौथी पर्यंत जवळपास ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ऐंशी विद्यार्थ्याचा मुतारी व बाथरूमचे नविन इमारतीच्या ठिकाणी बांधकाम झाले नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा येथे बोजवारा उडताणा दिसणार आहे. ठेकेदार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंता यांच्या हेतुस्पर संबधांची चौकशी व्हावी अशी मागणी म्हसळा शहरातील नागरीक करित आहेत.

काम अपुर्ण मात्र बिल काढले पुर्ण-
म्हसळा शहरातील राजीप उर्दू शाळेच्या नवीन वर्गखोलीचे बांधकाम अदयाप अपुर्ण स्थितीत व निकृष्ठ दर्जाचे असुन या कामाचे सर्व बिल निविदा रक्कमेपेक्षा जास्त अदा केल्याची चर्चा सध्या म्हसळा शहरात रंगली आहे.

कारवाई होणार का ?
२०१६ साली म्हसळा उर्दू शाळा व खारगाव बु. शाळा यांच्या बांधकामासाठी वर्क ऑर्डर निघाली होती. दोन्ही शाळांना बांधकामासाठी समान रक्कम आली असताना खारगाव बु. शाळा एका नजरेत देखणी दिसणारी व उच्चम दर्जाची झाली आहे. आता या शाळेत विदयार्थी शिक्षण घेतात.मात्र समान रक्कम मिळून सुद्धा म्हसळा शहरातील उर्दू शाळा निकृष्ठ दर्जाची झाली असून अद्याप पुर्ण नाही. विदर्यार्थ्याच्या भविष्याशी खेळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारा विरुद्ध कारवाई होणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा