प्रतिकात्मक फोटो
म्हसळा (बाबू शिर्के)
नेहमी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन मिरविणाऱ्या तसेच सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. श्रीवर्धन आगाराच्या बसला भरपावसात लागलेल्या गळतीमुळे प्रवासी न्हावून निघाले आहेत. श्रीवर्धन बोर्ली मुंबई या बस मध्ये हा प्रकार घडला.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. या पावसाचा फटका 28 जून रोजी सकाळी सुटलेल्या श्रीवर्धन बोर्ली मुंबई बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. बस आगारातून जोरदार पावसाला सुरूवात झाली. बसच्या छतातून पाण्याची गळती झाल्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. काही प्रवाशांच्या सीटवर पाणी पडू लागल. हे पाणी तुटलेल्या खिडक्यान मधून व बसच्या छतामधून खाली बसलेल्या महिला प्रवाश्यांच्या अंगावर पडू लागले,हा प्रकार एकाच सीटवर घडला नसून बस जवळपास ५ ते ६ ठिकाणहून गळत होती. बसमधील महिला व बालकांना यावेळी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या बाबत बस मधील वाहकाजवळ तक्रार केली असता त्याने मी काय करू गाडी अशी दिली तर असे उत्तर दिले.
खराब बसेस वापरल्यास, गळक्या बसेसमुळे प्रवासी भिजल्यास कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार त्यामुळे अश्या गळक्या बसेस न वापरण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिलेले होते मात्र ज्या बसेस सेवेतून बाद झालेल्या आहेत,ज्याची फिटनेस लाईफ संपलेली आहे अश्या बसेस ह्या प्रवाश्यांना डोकेदुखी ठरत आहे,
एसटीच्या १६ हजारांवर बस रोज राज्यातील विविध १८ हजार मार्गांवर धावतात. आर्थिक डबघाईस आलेल्या परिवहन महामंडळाचे सर्वाधिक प्रवासी ग्रामीण भागातच आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नेहमी ओरड होत असते. महामंडळाच्या अनेक बसेसचे छत, साईड बॉडी व खिडक्या खराब असल्याने पावसाळ्यात बसमध्ये पाणी टपकत असते. त्यामुळे प्रवास्यांना गळके पाणी अंगावर घेत प्रवास करावा लागत असल्याचे स्थिती आहे. याबाबत नागरिकांतून व्यक्त होत असलेला रोष लक्षात घेवून मंत्री रावते यांनी ऑक्टोंबर २०१७ मध्ये खराब बसेस न वापरण्याची सूचनाही आगारप्रमुखांना नियंत्रकांना दिल्या होत्या . राज्यात आजही शेकडो बसेस गळक्या व भंगार अवस्थेतल्या रस्त्यांवर धावत आहे मात्र याकडे गांभीर्याने बघितले जात नाही किंवा प्रवाशांच्या जीवाशी एक प्रकारचा खेळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Post a Comment