म्हसळा (बाबू शिर्के)
रायगड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक आणी माजी सभापती शिवसेना नेते महादेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. कृष्णा कोबनाक हे श्रीवर्धन मतदार संघातील भाजपचे बडे नेते असून त्यांचा या मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. तसेच त्यांचा प्रयत्नाने श्रीवर्धन मतदार संघातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. तर माजी सभापती महादेव पाटील यांना प्रशासनाचा अनुभव असून त्यांनी सभापती असताना अनेक कामे मार्गी लावली आहेत. या दोघांची रायगड जिल्हा नियोजित समितीवर निवड झाल्याबद्दल प्रशांत शिंदे, सुजीत तांदलेकर, भाजप तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के, प्रकाश रायकर, महेश पाटील, अमित महामुनकर, अनिल काप, अनिकेत पानसरे, मंगेश मुंडे, मंगेश म्हशीलकर, अनंत नाक्ती यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या दोन सदस्यांकडून अधिक निधी म्हसळा तालुक्याकरिता वळविण्याची अपेक्षा आता तालुक्यातील जनतेला आहे.

Post a Comment