श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून फिल्मी स्टाईल ने त्यांच्या कडून खंडणी मिळवणारी टोळी श्रीवर्धन पोलिसांनी जेरबंद केली आहे .पोलिसां कडून प्राप्त माहिती नुसार संबधित टोळी तरुणांना हनी ट्रॅप चा उपयोग करून लुटत असे .पीडित तरुनाने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत संबधित टोळी ने त्यास तरुणीच्या मोबाईल वरून फोन करून माणगांव येथील मयूर लॉज वर बोलावून घेतले .पीडित तरुणांशी टोळीतील मुलीने मी तुला ओळखते व माझे वडील आजारी आहेत त्याचा उपचारासाठी पैशांची गरज आहे तू पैसे दिल्यास तुला हवे ते देते असे सांगितले .संबधित तरुण माणगांव ला गेल्यावर त्यास तेथे नियोजन पूर्वक अडकवण्यात आले .त्या समयी आरोपी विशाल सुरेंद्र मोरे हा त्या तरुणीचा भाऊ बनून व भूषण विजय पतंगे पत्रकार बनून त्या ठिकाणी हजर झाले .कॅमेरे व मोबाईल वर त्यानी संबधित पीडित तरुणांची रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली व त्यास मारहाण करून आरोपी जगदीश गणपत ठाकूर यांच्या झायलो कार मध्ये जबरदस्ती ने बसवले व त्याचे अपहरण करून त्याची सुटका करण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली .संबधित प्रकरण पोलिसांच्या निदर्शनांस आल्या नंतर श्रीवर्धन पोलिसांनी आरोपी भूषण विजय पतंगे वय (29),विशाल सुरेंद्र मोरे (33) ,कुणाल यवनेश्वर बंदरी (28),सिध्दर्थ महेश मोरे (27)व अलका मोहन ठाकूर वय(65) राहणार अलिबाग जगदीश गणपत ठाकूर (42)मुरुड ,अक्षय सुनील दासगावकर (25) माणगाव यांना अटक केली आहे .तसेच पूजा व अजून एक अनोळखी महिला यांचा तपास पोलीस घेत आहेत .

Post a Comment