कर्ज बुडवणाऱ्यांच्या यादीत दोन नावे वाढली..बॅकेचे करोडो रुपये थकवल्या प्रकरणी दिघी पोर्टचे डायरेक्टर कलंत्री पिता - पुत्र डिफॉल्टर घोषित : देशातील १६ बँकाचा ३,३३४ कोटीचा कर्ज
म्हसळा (निकेश कोकचा)
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टचे डायरेक्टर पिता-पुत्र विजय कलंत्री व विशाल कलंत्री यांनी बँकेचे करोडो रुपये स्वार्थपणाने थकाविल्या प्रकरणी बँकेने नोटीस काढून त्याना डिफॉल्टर घोषित केले आहे.
राजकीय संबधांच्या जोरावर मुंबईतील मोठया उदयोगपतीच्या यादित पोहचलेल्या कलंत्री पितापुत्रांना बॅक ऑफ बडौदाने "विलफुल डिफॉल्टर " म्हणजे स्वार्थपणाने कर्ज न फेडणाऱ्यांच्या यादीत टाकले आहे. विजय गोवर्धनदास कलंत्री हे श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे विकसित होत असलेल्या अंतराष्ट्रीय पातळीच्या दिघी पोर्टचे चेयरमन व एमडी आहेत. कलंत्रीचा मुलगा विशाल कलंत्री दिघी पोर्टचा डायरेक्टर आहे. या दोन्ही पितापुत्रांनी देशातील १६ बँकांचे एकून ३,३३४ कोटी रुपये थकवले आहेत.
बॅक ऑफ बडौदाने २ जुन रोजी मुंबई येथिल वृत्तपत्रामध्ये सार्वजनिक नोटीस जाहीर केली होती. यामध्ये सामान्य मानसांना सुचना देत विजया बँक ( आता बॅक ऑफ बडौदा ) ने बँक/ आरबीआय नियमांनुसार १) दिघी पोर्ट प्रा.लि. ( कर्जदार ) २ ) विशाल विजय कलंत्री (डायरेक्टर व जामिनदार ) ३ ) विजय गोवर्धनदास कलंत्री ( डायरेक्टर व जामिनदार ) यांनी कर्ज थकवल्याने त्यांना विलफुल डिफॉल्टर घोषित केले होते.
Post a Comment