सलाम रायगड पोलिस : शिवराज्यभिषेक सोहळा २०१९

सलाम रायगड पोलिस :  शिवराज्यभिषेक सोहळा २०१९
प्रतनिधी रायगड
रायगड जिल्हयातील महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील किल्ले रायगड येथे 346 वा शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाकरीता सुमारे 2 लाख शिवभक्त/शिवप्रेमींचा सहभाग अपेक्षीत होता. त्या अनुषंगाने रायगडावरील मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण (होळीचा माळ) तसेच वाहन पार्कींगच्या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता रायगड जिल्हा पेालीस दलातर्फे या वर्षी सर्व बाबींची शास्रोक्त पध्दतीने विचार करून चोख, परिणामकारक व शिवभक्तांना सुसह्य ठरेल अशी गडावरील व गडाखालील अशा दोन मुख्य टप्प्यात चोख बंदोबस्त व्यवस्था करण्यांत आली होती.
  गड व परिसरातील अपु-या सोईसुविधा लक्षात घेता संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमा दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडून कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून श्री.अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगड यांनी नियोजनबध्दरितीने बंदोबस्ताची आखणी केली. बंदोबस्तासाठी 1 अपर पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपअधीक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 36 सपोनि/पोलीस उप निरीक्षक असे एकुण 54 पोलीस अधिकारी व 519 पोलीस कर्मचारी तसेच 78 वाहतुक पोलीस कर्मचारी, 268 होमगार्ड तसेच 3 SRPF प्लाटून असे मनुष्यबळ पेालीस बंदोबस्तासाठी अहोरात्र वेगवेगळया टप्प्यात लाठी, हेल्मेट, रेनकोट व टोर्चसह नेमले होते.
चित्त दरवाजा टी-जंक्शन या ठिकाणापासुन ते चित्त दरवाजा यामध्ये झिक जॅक बॅरेकेटींग करून 1 पोलीस अधिकारी व त्यांचे सोबत कर्मचारी नेमून गडावर येणा-या शिवप्रेमींना गटागटाने नेवून त्यांना कार्यक्रमाचे ठिकाणी सेक्टरवाईज बसविण्यांत आले. व त्यानंतर त्याच पध्दतीने त्यांना गड उतार होताना नियोजनबध्द रितीने परत सोडण्यात आले. त्यामुळे संपूर्ण गर्दीवर योग्यरितीने नियंत्रण करता आले.
नातेखिंड मार्गावरून केवळ मोठी/अवजड वाहने व व्हीआयपी/आयोजक/प्रशासनाची छोटी वाहने जातील अशी व्यवस्था करण्यांत आली होती. कोंझर घाट/पाचाड ते ढालघर फाटा यामधील अवजड वळणे व घाट या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टेंन्ट लावून त्याठिकाणी क्रेन, मॅकेनिक, इमर्जन्सी लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यांत आलेली होती. 
  त्याच प्रमाणे शिवराज्यभिषेका दरम्यान येणा-या शिवभक्तांची वाहने पार्कींग व वाहतुक व्यवस्थापन हे देखील या वेळेस शास्रोक्त पध्दतीने करून सुमारे 14,000 दुचाकी व 8000 ते 12000 चारचाकी वाहनांकरिता वाळसुरे, कोंझर व पाचाड जिजामाता समाधीच्या बाजूस पार्कींगची चोख व्यवस्था करण्यांत आली होती. तसेच पार्किंग मध्ये शिवभक्ताने वाहन पार्क केल्यानंतर त्यांना पार्कींग पासून पुढे गडाच्या खाली व्दारापर्यंत खास एस.टी.बसने मोफत नेण्यात आले व नंतर पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर टप्प्या टप्प्याने व गटागटाने परत वाहन पार्कींग च्या ठिकाणी मोफत सोडण्यात आले. त्यामुळे एकदम वाहनांची गर्दी रायगड मार्गावर किंवा राष्ट्रीय मार्गावर न होता, संपूर्ण कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहून शिवभक्तांना संपूर्ण प्रवास सुखकर झाला. 
शिवराज्याभिषेक सोहळा सन 2019 हा शिवप्रेमी/शिवभक्तांना कोणत्याही प्रकारच्या वाहतुक कोंडीस किंवा अप्रिय घटनेस सामोरे न जाता सुखकर पध्दतीने झाला याकरीता पोलीस प्रशासनाने अथक/अविरत परिश्रम घेवून कायदा व सुवस्था उत्तम राखली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा