संतोष सापते : श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धनमध्ये भ्रमंती साठी आलेल्या चिली देशाच्या पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास घडली. सदर घटनेतील दोन आरोपीना श्रीवर्धन पोलिसांनी रात्री अटक केली आहे.
पर्यटनस्थळ म्हणून जागतिक पातळीवर श्रीवर्धनची ओळख आहे. परंतु श्रीवर्धनमध्ये पर्यटक सुरक्षित नसल्याच्या विविध घटना घडत आहेत .चिली देशाच्या दोन पर्यटक महिलांनी श्रीवर्धन मध्ये दिनांक 05 /06/2019 ते 08/06/2019 या कालावधी साठी हॉटेल बुक केले होते. काल सायंकाळी सुमारे सहा च्या आसपास सदर महिला पर्यटक मार्केटमधून खरेदी करून नारायण पाखाडीमधून त्यांच्या हॉटेलजवळ जात असताना आरोपी रफिश दफेदार, महंमद कैफ यांनी त्याच्याशी असभ्य वर्तन करून त्याना शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केला आहे. त्यानंतर सदर महिला पर्यटकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या नुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा र क्र 12/2019 भादवी कलम 354, 354 ड, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी एस जाधव करत आहेत.
सदर घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.विशेष बाब कलम 351 व कलम 412 जबरदस्ती व हल्ला करणे या दोन कलमांचा समावेश गुन्हात केलेला नाही .तसेच
उपविभागीय पोलीस अधीक्षकांनी संबधित पीडित विदेशी तरुणींना पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी विरोध दर्शविला आहे .
काही महिन्यांपुर्वीच तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकां कडून मारहाण झाली होती. त्याचे दूरगामी परिणाम पर्यटन व्यवसायावर झाले होते .त्यावेळी श्रीवर्धन मधील जनतेने पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मारहाणीचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला होता .आज विदेशी महिला तरुणींच्या विनयभंगाचे वृत्त समजताच श्रीवर्धन मधील नागरिक पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले होते.पर्यटका सोबतच्या गैर प्रकारच्या घटना उत्तरोत्तर वाढत राहिल्यास त्याचे दूरगामी परिणाम श्रीवर्धन मधील पर्यटनावर होण्याची दाट शक्यता आहे
Post a Comment