म्हसळा : वार्ताहर
तालुक्यातील काळसुरी गावात विजेचा शॉक लागून एक बैल मृत्यूमुखी पडला . गुरुवार १३ रोजी दुपारी १२ वा . सुमारास काळसुरी गावातील शेतकरी धर्माजी पाटील हे त्यांचा बैल घेऊन जात असताना बैलाला विजेच्या खांबाचा शॉक लागला व तो बैल जागीच तडफडून मृत्युमुखी पडला . या शेतक - याला नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे . गावातील सडलेले विजेचे खांब बदलून देणे , घरांवर लोंबकळत असलेल्या वीज वाहक तारा , मेन लायनीच्या सव्र्हिस वायरी बदलून देण्याची मागणी २०१७ पासून म्हसळा वीज वितरणकडे लेखी पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही , असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे . याबाबत स्थानिक वायरमन व विजवीतरण विभागाला माहिती देण्यात आली होती . तरीही त्यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला , अशी माहिती अध्यक्ष किशोर सावकार यांनी दिली . तसेच या घटनेची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
काळसुरी गावात घडलेली घटना दुदैवी आहे. संबंधित घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वरिष्ठांना त्याबाबत कळविले आहे . शेतक-याला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल .
-यादव इंगळे , उपअभियंता , म्हसळा वीजवितरण विभाग

Post a Comment