श्रीवर्धनमध्ये गेले ३ ते ४ दिवस बत्तीगुल ; विजप्रवाह खंडीत झाल्यामुळे श्रीवर्धनकर आंधारात




श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरामध्ये गेले ३ दिवस अधांराचा जणू काही विळखा बसलेला आहे . पावसाने श्रीवर्धनमध्ये आगमन केले . परंतु त्यानंतर विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे . एकतर नागरिक उष्माने हैराण झाले आहेत . त्यातच विजेचा हा लंपडाव होत असल्याने श्रीवर्धनमधील नागरिक संताप व्यक्त करित आहे . आज जवळजवळ तीन ते चार दिवस उलटून गेले तरी श्रीवर्धन तालुक्यामध्ये परिस्थिती जशीच्यातशीच आहे . त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे . तालुक्यासह श्रीवर्धन शहरामध्ये विद्युत लाईट नसल्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्यलयीन कामकाज पुर्ण ठप्प झाले आहे . त्यात श्रीवर्धनमध्ये पाण्याची भीषण टंचाई झाली असून श्रीवर्धन तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना दररोज टँकर ने पाणी पुरवठा केला जातो . परंतु विद्युत लाईट नसल्यामुळे टॅकरमध्ये पाणी भरु शकत नाही . पाणी न भेटल्यामुळे खेड्या पाड्यातील व शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी पोहचवू शकत नाही , त्यामुळे पाणी न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत . शिवाय दैनंदिनी कामकाजवर यांचा विपरीत परिणाम होत आहे . मान्सूनपुर्व कामे न केल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे . त्यातच वादळी वाऱ्या मुळे अधिक भर पडली आहे . सोसाट्याच्या वादळी वा-याने काही ठिकाणी विद्युत पोल कोलमडले आहेत , त्यामुळे विज खंडित झाली आहे . अशा अनेक कारणांमुळे नागरिकांना सतत तीन ते चार दिवस अंधारात रहावे लागले आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा