मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर ए. के. सिंग यांची भेट घेतली. मुंबई व कोकणाला जोडणाऱ्या रेल्वेतील समस्यांबाबत यावेळी चर्चा झाली.
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
ता. पेण, जि. रायगड येथे रेल्वे स्थानक व्हावे तसेच काराव रेल्वे क्रॉसिंग ते तलाव कारावी गावापर्यंत सर्व्हिस रोड व्हावा, पेण तालुक्यातील खारपाडा येथे अनेक वर्षांपासून मंजूर झालेले रेल्वे स्थानक मार्गी लावावे, गडब, कासु ता. पेण, जि. रायगड येथे जवळपास ४० हजार लोकसंख्या असून हा भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आला आहे. इथे नामांकित कंपन्या कार्यरत असून नियमित सात ते आठ हजार लोक मुंबई तसेच इतर ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे येथे नव्याने रेल्वे स्थानक किंवा कोकण रेल्वेचा थांबा व्हावा, पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या थांबवाव्यात, मेढा रेल्वे स्थानकातील प्रलंबित कामे पूर्णत्वास न्यावी, कोकण रेल्वेतून रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कुठेही बसण्याची मुभा मिळावी या आणि अशा अनेक मागण्या यावेळी मध्य रेल्वेसमोर ठेवल्या.
तसेच, रोहा ते आपटा दरम्यानच्या जमिनी कोकण रेल्वेने संपादित केल्या. मात्र ही स्थानके मध्य रेल्वे समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याबाबत दोन्हीकडून टोलवाटोलवी करण्यात येत आहे. हा वाद मिटवून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली

Post a Comment