खासदार सुनिल तटकरे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने श्रीवर्धन मतदार संघातील 8 गावांच्या रस्ता विकास कामांसाठी सुमारे 20 कोटींचा निधी मंजुर
म्हसळा -वार्ताहर
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाड्यावस्त्या तालुका शहराला जोडणे व सद्यस्थितीत अस्तित्वातअसलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या गाववाडी रस्त्यांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन रायगडचे खासदार सुनिल तटकरे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांची शिफारस आणि त्यांचे विशेष प्रयत्नाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा,श्रीवर्धन,तळा आणि माणगाव तालुक्यातील 8 गावांंच्या रस्ता सुधारणा कामाला सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.रस्ते विकास कामांत म्हसळा तालुक्यातील दोन,श्रीवर्धन मधील एक,तळा तालुक्यातील दोन आणि माणगाव तालुक्यातील तीन गावजोड रस्त्यांचा समावेश आहे.श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आसुन येथे विकास कामांचे जोरावर नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुनिल तटकरे यांना तब्बल 38 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात नव्याने होणार असलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या आघाडीत अधिक भर देणारी ठरणार असल्याने खासदार सुनिल तटकरे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी येथील विकास कामांना अधिक प्राधान्य दिले असल्याचे निदर्शनास येत आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्यांनी शिफारस केलेल्या श्रीवर्धन मतदार संघातील गावजोड रस्ते विकास कामांमध्ये प्रामुख्याने
1) एम.एच.एस.- 4 रानवली-वडघर जोडरस्ता,लांबी 3.900किमी,तालुका श्रीवर्धन,कामाची अंदाजित रक्कम 326.31लाख रुपये,
2)सावर ते चिरगाव बौद्धवाडी रस्ता,तालुका म्हसळा,लांबी 2.5किमी,अंदाजित रक्कम 202.46 लाख रुपये
3)ओडीआर 129 पाष्टी ते मोरवणे रस्ता,तालुका म्हसळा,लांबी 2 किमी,अंदाजित रक्कम 121.55 लाख
4) खांबीवली ते रहाटाड रस्ता,तालुका तळा,लांबी 3.90 किमी,अंदाजित रक्कम 350.61लाख,
5)व्ही.आर.22 ते चरई आदिवासीवाडी बेलघरनजीक रस्ता,तालुका तळा,लांबी 1.359 किमी,कामाची रक्कम 99.59लाख,
6)एस.एच. 98 पाणोसे रस्ता, तालुका-माणगाव,लांबी 3.450 किमी,अंदाजित रक्कम 187.69 लाख रुपये,
7)एन.एच.17 दाखणे ते मुंडेवाडी रस्ता,तालुका-माणगाव,लांबी 3.800किमी, कामाची अंदाजित रक्कम 336.21लाख,
8)एन.एच.17 कालवण ते कालवण आदिवासीवाडी रस्ता,तालुका-माणगाव,लांबी 3.250 किमी,अंदाजित रक्कम 356.85 लाख रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे.
वरील सर्व मिळून सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी नमुद केले आहे.प्रसिद्धी पत्रात आदिती तटकरे यांनी अधिकपणे नमुद करताना वरिल सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर त्या त्या भागातील ग्रामस्थांची दळणवळणाचे दृष्टीने मोठया प्रमाणात सोय होणार आहे.एकमेकांना पासुन दुर राहिलेली ही गावे वाडीवस्ती व शहराच्या अधिकतम जवळ येणार आहेत.विकासाच्या दृष्टीने मंजूर झालेल्या या सर्वच कामांना महत्त्व आहे.जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याचा दृष्टीकोन ठेवुन आमच्या कडुन सततचे प्रयत्न चालु आहे.भविष्यात या कार्यक्रमाखाली जिल्ह्यातील व प्रामुख्याने श्रीवर्धन मतदारसंघातील उर्वरित कामांना खासदार सुनिल तटकरे,आमदार अनिकेत तटकरे आणि माझ्या कडुन सततचा पाठपुरावा राहील असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
अनेक वर्षांपासून रस्त्या वाचुन वंचित राहावे लागलेल्या श्रीवर्धन मतदार संघातील वरील आठ गावांचा मुख्य प्रश्न आता कायम मार्गी लागला आहे.


Post a Comment