म्हसळा (निकेश कोकचा )
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमात बदल करण्यात आले असून या योजनेचा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान म्हसळा तहसिलदार शरद गोसावी यांनी केले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पुर्वी २:०० हे.आ. पर्यंत धारण मर्यादा होती.२ :०० हे.आ. पर्यंतची धारण मर्यादा केंद्र सरकारने शिथिल केली असून आता या योजनेअंतर्गत छोट्या -मोठया सर्व शेतकऱ्यांचा ( नोकरदार व पेंशनधारक शेतकरी सोडून )समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रति वर्षी तिन समान हप्त्यामध्ये सहा हजार रुपये वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती तहासिलदा गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहासिलदार शरद गोसावी यांनी शेतकऱ्यांना स्वताचे आधार कार्ड, बँकेचे पासबूक व रेशनकार्डची झेरॉक्स घेऊन परिसरातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांचा सोबत संपर्क साधून योजनेसाठी अर्ज करण्याचे आव्हान केले आहे.

Post a Comment