म्हसळा : सुजित पोटले २१ जून २०१९ जागतिक योग दिनानिमित्त म्हसळा तालुक्यातील चिखलप केद्रामधील सर्व शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. योगा याबाबत प्रार्थना, पूरक हालचाली मानेच्या हालचाली, मानेचे उजवीकडे व डावीकडे हालचाली , मान उजवीकडे व डावीकडे वळवणे, खांद्याची हालचाल ,कंबरेच्या हालचाली, पायाच्या हालचाली , योगासने, दंड स्थितीतील आसणे, बैठक स्थितीतील आसणे ,पोटावर झोपून करावयाची आसणे, पाठीवर झोपून करावयाची आसणे ,कपालभाती ,प्राणायम ध्यान, संकल्प ,शांतीपाट आदी बाबतीत चिखलप केंद्राचे केंद्र प्रमुख श्री कुमार खामकर सर यांनी मार्गदर्शन केले प्रत्यक्ष कृतीयुक्त आसणे केंद्रिय शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ताराम महाडीक गुरूजी यांनी सादरीकरण केले व त्या बरोबर विद्यार्थांनीही सक्रिय सहभाग घेऊन कृतीयुक्त योगासने केली. योगासने,प्राणायम करताना मानवाला कोण कोणते फायदे होतात आणि योगासने करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल माहिती विषय शिक्षक प्रकाश मांडवकर सर यांनी सांगितली.
यावेली चिखलप केंद्रातील शाला देवघर कोंड शाळेचे मुख्याध्याक परशुराम चव्हण,घोणसे शाळा रघुनाथ फडतरे, चिखलप शाळा दत्ताराम महाडिक गुरूजी ,प्रकाश मांडवकर, कुडतुडी गौळवाडी महेश खोले, चिरगाव शाळा विक्रांत पवार ,अमित महागावकर देवघर हायस्कुल मगरे मँडम, घाणेरी कोंड जयसिंग बेटकर, चिखलप आ.वाडी दिलीप शिंदे, बागाची वाडी गोरनाख चव्हाण, सरवर शाळा अशोक वाघ, ताम्हणे करंबे उमेश चव्हाण प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक,वर्गशिक्षक यांनी आपापल्या शाळास्तरावर योगासने यांचे सुंदर नियोजन केले होते .यामध्ये विद्यार्थी ,पालक यांनी उत्सुर्तपणे सहभाग घेतला होता.


Post a Comment