आदिती तटकरे आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत ; कृष्णा कोबनाक

आदिती तटकरे आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत ; कृष्णा कोबनाक
आगामी विधानसभा निवडणूक लढवणार 
म्हसळा (वार्ताहर)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे आम्ही आणले आहेत असे खोटे पत्र आपल्या सहीनिशी बनवून रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे हे कामांचे खोटे श्रेय घेत आहेत.या कामांचा आणि जिल्हा परिषदेचा काही संबंध नाही  यासाठी त्याआपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत.असा आरोप कृष्णा कोबनाक यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, तालुका चिटणीस तुकाराम पाटील, महिला प्रमुख मीना टिंगरे, सरोज म्हशीलकर, महेश पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणी राष्ट्रीय पेयजल योजना या मार्फत कोट्यवधी रुपयाची कामे श्रीवर्धन मतदार संघात चालू आहे.केंद्रात आणी राज्यात भाजपचे सरकार असल्याने आणी या कामांचा पाठपुरावा मी स्वतः केला असल्याने या कामांचे खोटे श्रेय राष्ट्रवादीने घेऊ नये असा इशारा त्यांनी बोलताना दिला.आगामी विधानसभा निवडणूक बाबत त्यांना विचारले असता  लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला श्रीवर्धन मतदार संघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते.त्यामुळे पुढील होणाऱ्या विधानसभा कठीण असून  शिवसेनेकडून राष्ट्रवादीसमोर कोणीही लढायला तयार होणार नाही. त्यामुळे या मतदार संघात भाजपने अनेक विकास कामे केले असल्याने हा मतदारसंघ भाजपला मिळावा असा दावा करणार असून युतीच्या माध्यमातुन पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढायला तयार आहे असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा