संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
ऐन पावसाळ्यांत रायगड जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्याना मान्सूनची वाट पहावी लागत आहे.तालुक्यात गुरवार दि. २० जून पासुन आज शनी.२३ जून पर्यंत पावसाचा एक थेंबही पडला नाही, तीच परीस्थीती जिल्हयातील १५ तालुक्यात आहे. त्यामुळे वाढलेले उष्णता मान यामुळे आंगाची काहीतरी (लाहीलाही) होत आहे.मागील तीन वर्षाचे आजच्या तारखेला सरासरी पर्जन्यमान ४९३.९६ मी मी.होते.आज मीतीला जिल्ह्यांत केवळ १५६.७३ मीमी पावसाची नोंद आहे.
हवामानांतील बदल व वाढती मजुरीमुळे शेती धोक्यात
हवामानांत सततच्या बदलामुळे तालुक्यातील भातपिका खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील पाच वर्षापूर्वी म्हसळा तालुक्यात ३४०० हेक्टर क्षेत्र भातपिका खाली होते. आज केवळ २९०० हेक्टर क्षेत्रात भातपिक घेतले जाते.तालुक्यात एकेकाळी मोठ्या संख्येने मजूर होते. गेले काही वर्षापासून स्थानिक मजुरानी मुंबईला जाणे पसंत केले आहे. स्थानिक मजुरीला किमान रु६०० व ३०० आहे. पावसाच्या लहरीपणामुळे एकाच वेळी लावणी सुरू झाल्यास स्थानिक मजुरांची कमतरता होते व अचानक मजुरीचे दरही वाढतात. म्हणूनच पिकाखालील क्षेत्र कमी होत आहे.
शासनानी भात लावणीसाठी यांत्रिक अवजारे पुरवावी, महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. मात्र, एकाच वेळी सर्वच ठिकाणी लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासते त्यासाठी हा पर्याय योग्य ठरेल.
महादेव म्हात्रे, खारगाव ( खु )

Post a Comment