अभय पाटील : बोलपंचतन
दिवेआगर समुद्रामध्ये पर्यटकांच्या मौज मसतीसाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटसारख्या बोटींग चालू असतात . त्यांना पावसाळा सुरू होण्याआधी म्हणजेच २५ मे अखेर चालू ठेवण्याची परवानगी असते ; परंतु मेरिटाईम बोर्डाच्या आदेशाला धुडकावून दिवेआगर समुद्रा मध्ये १५ व १६ जून ह्या सुट्टीच्या दिवशीदेखील बिनदिक्कत खवळलेल्या समुद्रामध्ये बोटींग सुरूच असल्याचे निदर्शनास आले असून पर्यटकांच्या जीवाशी सुरु असलेल्या खेळाकडे मेरिटाईम बोर्ड का कानाडोळा करीत आहे ? याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे . एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवेआगर सुद्रकिनारा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती असून सुट्टीमध्ये याठिकाणी लाखो पर्यटक येत असतात . दिवेआगर समुद्रकिनारी घोडागाडी , सँड बाईक त्याचप्रमाणे समुद्रामध्ये स्पीड बोट , बनाना बोट व इतर बोटिंग करण्याची मजाही पर्यटक घेत असतात तर पॅरासिलिंगदेखील सुरु असते ; परंतु मुरुड येथे पॅरासिलिंगमधून पडून झालेल्या घटनेमुळे दिवेआगर येथील पॅरासिलिंगदेखील मे महिन्याच्या कालावधीमध्ये बंद करण्यात आले . तर इतर समुद्रामध्ये सुरु असणारे बोटींग २५ मे नंतर बंद करण्याचे लेखी आदेश मेरिटाईम बोर्डाचे आदेश असतानाही त्या आदेशाना धुडकावून दिवेआगर समुद्रामध्ये १५ व १६ जून या सुट्टीच्या कालावधीमध्ये खवळलेल्या समुद्रामध्ये बिनदिक्कत पर्यटकांच्या जीवाशी खेळत फक्त पैसे कमविण्याच्या उद्देशाने बोटिंग सुरु होती . ही बोर्टीग कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे ? असा प्रश्न उपस्थित होत असून जर अशा परिस्थितीमध्ये कोणती दुर्दैवी घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . या अनधिकृत बोटींगला आवर कोण घालणार ? याबाबत बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांच्याकडे संपर्क साधला असता आपण दोन दिवस सुट्टीवर होतो, त्यामुळे लक्ष देता आपले नसल्याचे त्यांनी सांगितले . तर याबाबत आपण चौकशी करु असेही सांगितले .

Post a Comment