म्हसळा श्रीवर्धन तालुका आगरी समाज संघटना अध्यक्षपदी संतोष पाटील यांची निवड


म्हसळा वार्ताहर
 म्हसळा श्रीवर्धन तालुका आगरी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पाटील यांच्यासह समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सल्लागार समितीची निवड करण्यात आली .या प्रसंगी संघटनेचे मावळते अध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात आगरी समाज मोठ्या संख्येने असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते.मावळते अध्यक्ष महादेव पाटील व कार्यकारणीने समाजाच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न व मेंदडी येथे एक कोटी रुपये खर्च करून बांधलेले सुसज्ज असे आगरी भवन इमारतीचे काम पूर्ण झालेले  काम यामुळे नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून आगरी समाज बांधवांच्या समाज उन्नतीसाठीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष संतोष नथुराम पाटील गोंडघर,उपाध्यक्ष संतोष रामा नाक्ती वडवली,सचिव रामचंद्र म्हाञे खरसई,सहसचिव रूषिकांत गायकर बोर्लीपंचतन,खजिनदार भालचंद्र गाणेकर गणेश नगर ,सल्लागार महादेवराव पाटील ,परशुराम मांदाडकर,अनंत धनावडे,विष्णु धुमाळ रत्नाकर पाटील,हिशोब तपासणीस नथुराम खोत सकलप .या सर्वांना समाजाच्या उन्नतीसाठी पुढील वाटचालीस अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा