मैत्री फाउंडेशन तर्फे शिरवली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वापट...



श्रीकांत बामणे
मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे रविवार दिनांक 16 जून 2019 रोजी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शिरवली आदिवासी प्राथमिक शाळा आणि विभागातील इतर गावात विध्यार्थ्यांना मोफत वह्या, तसेच ज्या विध्यार्थ्याना आई वडील नाही अश्या निराधार विद्यार्थीना शिक्षणाची आवड असून त्याना त्या प्रकारे  सुविधा मिळूऊन देण्यासाठी मैत्री फाउंडेशन मार्फत  शालेय बॅग, छत्री, कम्पास पेटी, वह्या, पेन, पेन्सिल चे  मोफत वाटप करण्यात आले, तसेच खाऊ वाटप सुध्दा करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मैत्री फाउंडेशन चे सदस्य महेश मनवे, रवींद्र मनवे, रोहन मनवे, आशिष सावंत, सिद्धेश पाटोळे, स्नेहा पाटोळे आणि इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटोळे सर यांनी केलं. सरपंच निलेशजी शिंदे आणि मोहनजी पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा