म्हसळा तालुक्यात बीएसएनएलच्या सेवेचे तीन तेरा ; ग्राहक वळत आहेत अन्य नेटवर्ककडे

म्हसळा तालुक्यात बीएसएनएलच्या सेवेचे तीन तेरा ; ग्राहक वळत आहेत अन्य नेटवर्ककडे

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
 म्हसळा तालुक्यात बीएसएनएलची सेवा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे बँका, ट्रेझरी,टपाल कार्यालयांतील आर्थिक व्यवहार , खरेदी-विक्री, महसुली नोंदी, ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया, S.T.आरक्षण या सर्वच सेवा -सुविधांवर त्याचे परिणाम होत आहेत. गेले ५ ते ६ दिवस कित्येक  तास  बीएसएनएलची इंटरनेट बंद पडल्याच्या घटना घडल्या. ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत असल्याने शासकीय व खासगी आॅनलाइन सेवा,सर्व बँकांचे आॅनलाइन कामकाज त्यामुळे बंद पडून आर्थिक व्यवहारांवर मोठा विपरित परिणाम होतो. त्याच बरोबरच सर्व नागरिक आॅनलाइन सेवेस वंचित राहतात. तालुक्यातील बीएसएनएलची सेवा ढेपाळल्यामुळे वायरलेस सेवेचे खाजगी ग्राहक नंबर पोर्टेबलीटीचा फायदा घेत जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडीया टाटा डोकोमो या अन्य खाजगी सेवांकडे आकर्षित झाले आहेत.
    तालुक्यांत केंद्र व राज्य सरकारची विविध २५ कार्यालये आहेत ही सर्व कार्याले बीएसएनएलची ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा वापरत असतानाही बीएसएनएलचे स्थानिक कार्यालयांकडे कोणतीही तक्रार न करता सर्व कार्यालये तालुक्यातील नागरिकानाच उलट वेढीस धरून खेटे मारायला लावतात.
      सरकारी वा खासगी अशा कोणत्याही यंत्रणेने वा कंपनीने खोदकाम करण्यापूर्वी बीएसएनएल कंपनीस लेखी कळवून, संबंधित खोदकामाच्या ठिकाणी जर बीएसएनएलची आॅप्टिकल फायबर केबल असेल तर बीएसएनएलचे अभियंते वा कर्मचारी यांच्या उपस्थितीतच खोदकाम करणे अनिवार्य आहे.परंतु अनेकदा याबाबत कळवले जात नाही. त्यामुळे खोदकाम केले जाते आणि त्यावेळी बीएसएनएलची आॅप्टिकल फायबर केबल तुटते, असे प्रसंग दरमहा किमान १५ ते २० वेळेला अनुभवास येत असल्याची माहिती बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने दिली. कधी कधी पूर्वसूचना देऊनही बीएसएनएलचे अभियंता वा कर्मचारी खोदकामाच्या ठिकाणी येत नाहीत. परिणामी काम नियोजित वेळेत पूर्ण करणे अशक्य होते, अशी परिस्थिती जिल्हयातील मुंबई -गोवा , माणगाव -दिधी या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्यावर सतत येत असते.

"श्रीवर्धन -म्हसळा या तालुक्यातुन बीएसएनएलकडे आवश्यक इंजीनिअर, टेक्नीशिअन नसल्याने व अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे सेवेचे दर्जा ढासळला आहे. याच कारणाने अनेक ग्रामिण व शहरी ग्राहकानी बीएसएनएलकडे पाठ फिरवली आहे "

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा