श्रीवर्धन मध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी ; पोलीस दलाकडून नागरिकांना पुष्पगुच्छ वाटप

श्रीवर्धन मध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी ; पोलीस दलाकडून नागरिकांना पुष्पगुच्छ वाटपश्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
रमजान महिन्याच्या सांगता प्रसंगी  रायगड जिल्ह्यात  सर्वत्र एकाच वेळी बुधवारी मुस्लिम समाजा कडून ईद साजरी करण्यात आली .ईद हा नाविन्याचा प्रतीक असलेला सण आहे. शांतता , प्रेम ,ईश्वराची भक्ती  ,दया ,व करुणा हा संदेश  रमजान  मधील " रोजा "द्वारे दिली जातो.
आज शहरातील मुघल मोहल्ला ,बागवान मोहल्ला ,घोली मोहल्ला ,सरखोत मोहल्ला ,आयर मोहल्ला ,पुलपार मोहल्ला ,मुळगाव मोहल्ला मध्ये ईद  जल्लोषात साजरी करण्यात आली . पारंपरिक  पेहराव  परिधान  केलेल्या लहान मुलांच्या उत्सवाला उधाण आले होते .शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी  मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या त्या तून जातीय सलोखा  व प्रेम निदर्शनांस येत होते .विविधतेत एकता असलेल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते .
बुधवारी सकाळी मोघल मस्जिद च्या प्रांगणात श्रीवर्धन पोलीस दला कडून मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या .मंगळवारी सायंकाळी 07:45 ला चंद्र दिसल्या नंतर ईद सणाच्या तयारी ला सुरुवात झाली .श्रीवर्धन मधील सर्व बाजार पेठेत ग्राहकांची गर्दी निदर्शनांस आली . सुकामेवा ,फळे ,मटण  ,कापड दुकाने व सोना चांदी खरेदी साठी ग्राहकानी रांगा लावल्या होत्या .शहरातील केसकर्तनलाय रात्र भर चालू होते.

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, पंचतन , दिवेआगार ,शेखार्डी ,आरावी , वाळवंटी  ,आराठी ,जसवली  ,रानवली ,सायगाव ,बागमंडला , कोलमांडला  सर्व ठिकाणी ईद जल्लोषात साजरी करण्यात आली .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा