श्रीवर्धन मधील जयेश द. चोगले यांना राष्ट्रीय गौरव उत्कृष्टता पुरस्कार २०१९ जाहीर


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
भारतरत्न अटल राष्ट्रीय गौरव अलंकरण NATIONAL PRIDE EXCELLENCE AWARD 2019 राष्ट्रीय गौरव उत्कृष्टता पुरस्कार जयेश द. चोगले यांना जाहीर....
सोशल आणि स्पोर्ट या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील जयेश द. चोगले यांना राष्ट्रीय गौरव उत्कृष्टता पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार वितरण सोहळा १९ जून रोजी मध्य प्रदेश मधील होशंगाबाद  येथे होणार आहे. जयेश चोगले यांनी मार्शल आर्ट मध्ये गेली १६ वर्षे खेळासाठी दिलेले योगदान व  सामाजीक कार्याची असलेली जाण यामुळे जयेश द. चोगले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. एक उत्कृष्ट खेळाडू व एकनिष्ठ प्रशिक्षक आशी यांची रायगड जिल्ह्यातील  ओळख आहे त्यांनी आपल्या शैलीतून रायगड जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले आहे. डायनामीक यूथ स्पोर्ट अकाडमी व संपूर्ण रायगड जिल्ह्यातुन तसेच महाराष्ट्र राज्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा