रायगड मधील १६४ पो. अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या बदल्या.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जिल्ह्यातील १६४ पो. अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये १४ सहा.फौजदार व १५० कर्मचारी ( पोह, पोना, पोशी ) आहेत.एकाच पोलिस स्टेशनला पाच वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.म्हसळा पो. स्टेशन मधुन पोह सतीश महाडिक (पोलादपूर), निलेश सुखदेवे ( नेरळ), सुनील खंदारे ( गोरेगाव), प्रमोद कदम ( नागोठणे ) यांची बदली झाली आहे. महत्त्वाच्या गुन्ह्याच्या तपासात, आरोग्याचा समस्या, कौटुंबिक समस्या असणाऱ्या, वर्षाने निवृत्त होणाऱ्या काही पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यांतील २० पो. अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या बदल्याना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामध्ये मुख्यालयातील ९, अलिबाग २, म्हसळा ४, दिघी सागरी १, पाली २, दादर सागरी १, श्रीवर्धन १ यांच्या बदल्या स्थगित आहेत. म्हसळा पो. स्टेशनमधील शामराव कऱ्हाडे, गणेश भोईर, वैभव पाटील, श्रीमती मनिषा पिंगळे यांच्या बदल्याना १ वर्ष स्थगिती मिळाली आहे.बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आवडीनुसार बदलीची ठिकाणे देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा