म्हसळा रुग्णालय , एस . टी . स्थानकासमोर पाणी


म्हसळा : वार्ताहर
म्हसळा ग्रामीण रुग्णालय इमारत आणि एस टी स्थानका समोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचून नवीन खड़े तयार झाले असून नागरिकांना याचा त्रास होत आहे . अवजड वाहतुकीसाठी म्हसळा शहरातील वापरात असलेला सध्याचा हा खड्डेमय रस्ता सुमारे ८५ लक्ष रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आला आहे . एवढी रक्कम खर्च करूनही रस्त्याचा दर्जा किती चांगला आहे हे ठेकेदार आणि संबधीत कंपनीच्या अधिका - यांनाच याची माहिती असावी . म्हसळा वासीयांनी आवाज उठविल्यानंतर या रस्त्याची मुख्य समस्या सुटली , याबाबत सर्वच नागरिक संबंधीताना धन्यवाद देत आहेत . खड्डेमय रस्त्याची समस्या सुटताच लागलीच पाऊस सुरू झाल्यावर याच रस्त्यावर नवीन समस्या निर्माण झाली आहे , म्हसळा ग्रामीण रुग्णालय इमारत आणि एस टी स्थानका समोरील मुख्य रस्त्यावर पाणं साचून नवीन खडे तयार झाले आहेत . ही समस्य आता सुटणार कशी आणि सोडविणार कोण अस प्रश्न नागरिक विचारत आहेत . वास्तविक पाहता य ठिकाणी तालुक्यातील जनतेला एस . टी . स्थानका सुरळीतपणे प्रवास करता यावा आणि गाड्यांचे नीटपणे पार्किग व्हावे यासाठी मुख्य रस्त्याच्य दुतर्फ जागा उपलब्ध आहे . ठेकेदार आणि संबधीत कंपनीच्या प्रशासनाने मुख्य रस्त्याचे नूतनीकरण केले असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पडणारे पाणी जाण्यासाठी मार्गच राहिला नाही त्यामुळे त्याचे नियोजन न करता रस्ता तयार करण्यात आल्याने रस्त्याची उंची वाढून येथे दोन्ही बाजूल भले मोठे खड्डे तयार झाले आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा