(पुस्तक परीक्षण -: नाना नेटावटे , नाशिक )
जीवन संघर्षकार कवी नवनाथ रणखांबे यांच्या जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता वाचतांना मनुष्याला त्यांच्या भूतकाळातील घटनांचा क्रम आठवतो. वर्तमान काळ जगायला शिकवतो आणि भविष्यकाळाची जाणीव ही करून देतो.त्यांच्या कवितेतून आंबेडरवादी साहित्यिक हे कशा प्रकारे माणसाच्या जीवनात परिवर्तन निर्माण करू शकतो असा भाव कविता संग्रहात उभा केला आहे. समाज्यातील अनिष्ठ चाली रिती,रूढी परंपरा, विषमता,अज्ञान ,अंधश्रद्धा,भूक, भ्रष्टाचार, इ. विषयी कवी कवितेतून प्रबोधन करीत असल्याचे दिसते.त्यांच्या कवितेमध्ये सामाजिक बांधिलकी दिसते. त्यांच्या कवितेत अनुभूती प्रामाणिक आणि अस्सल आहे.आपल्या नवीन पिढ्याना उत्तेजन देण्याचे काम कविता संग्रह करतो. जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता ह्या संघर्षातून प्रेरणा देत मनुष्याला उंच क्षितिज्याकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. त्यांनी माय, बाप, प्रेम- विरह, जातीव्यवस्था, दुष्काळाच्या झळा, निसर्गाची उधळण , गावाकडील जगण्याचीच व्यथा , दुष्काळ ग्रस्त माय बाप शेतकऱ्यांची पावसाने कशा प्रकारे केलेली फसवणूक ....त्यामुळे झालेली हानी , तसेच माणुसकी हरवल्याची वेदना-भेदभाव इ . सामाजिक वास्तव कवितेतून दिसून येते. संघर्षमय कवितेतून कोणत्याही संकटाशी दोन हात करण्याची ताकद हा कविता संग्रह माणसाला देतो. प्रतिभावंत कवी नवनाथ रणखांबे यांनी आपल्या कवितेतून माणसाला माणूस म्हणून जगण्याचीच कला शिकवली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडर आणि बुद्धांचे विचार कवितेतून दिसून येतात.डॉ बाबासाहेब आंबेकडर हीच त्यांची प्रेरणा आणि ऊर्जा स्त्रोत आहे.
जीवनातील जगणाऱ्या संघर्षाला प्रेरणा देणारा जीवन संघर्ष कविता संग्रह सर्वानी वाचायलाच हवा.
कविता संग्रह जीवन संघर्ष/कवी नवनाथ रणखांबे/पुस्तक प्रकाशन शरदा प्रकाशन/पुस्तक परीक्षण नाना नेटावटे , नाशिक

Post a Comment