म्हसळ्यातील रंजनावहीनी पोतदार यांचे निधन .


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील धार्मिक व सांप्रदायिक पंथाकडे महीला ना आकर्षीत करणाऱ्या रंजना शांताराम पोतदार यांचे वयाचे ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने म्हसळा येथील रहात्या घरी निधन झाले. त्या रंजना वहीनी म्हणून शहरांत व तालुक्यात प्रसीध्द होत्या .त्यानी १९६९ -७० चे दरम्यान कर्नाटक व महाराष्ट्रांत प्रसिध्द असलेले परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता यांचे पंथाची व श्री कलावती देवी भजन मंडळाची म्हसळया मध्ये सुरवात केली त्यांचे वर सेवा प्रमुख म्हणून महत्वाची जबाबदारी होती.श्री कलावती माता यानी रचलेली पदे वहीनी आतिशय अवडीने गात असत.सामर्थ्य आहे चळवळीचे , जो जो करेल तयाचे परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहीजे ह्या उक्ती प्रमाणे प्रत्येकाने वागावे असे रंजनावहीनी नेहमी सांगत असत . त्यांचे निधनाने सांप्रदायिक पंथातील मंडळींसोबत स्थानिकानी दुःख हळहळ व्यक्त केली.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सूना , जावई, नातवंडे असा फार मोठा परीवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा