अखेर पाऊस कोकणात दाखल : म्हसळा येथे ५२ मि . मी . पाऊस


म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यातील विविध भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली . दरम्यान , गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिंपही सुरू आहे . यामुळे चाकरमानी व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली , तर आकाशाकडे डोळे लावून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी मात्र सुखावला आहे . 
 दडी मारलेल्या पावसाने अचानक धुवाधार बरसण्यास सुरुवात केल्यामुळे चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली . शाळकरी मुलांनी यांचा आनंद पुरेपूर घेऊन घरी भिजत जाणे पसंत केले . म्हसळा तहसीलदार कार्यालयातून पावसाची ५२ मि . मी . नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा