रविकांत काप : गोंडघर
गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर भुलेश्वर (स्थानिक/मुंबई) यांच्या विद्यमानाने रविवार, दि. १६ जून २०१९ ईयत्ता १ली ते ७वी शैक्षणिक वस्तू आणि मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षण कमिटीच्या अध्यक्षा मा. सौ. संयुक्ता मासेकर ताई यांनी भूषविले.
कु. सक्षम संदेश काप हा Lip For Word ह्या गोरेगाव (रायगड) इथे झालेल्या स्पर्धा परीक्षेत प्रथम आला त्याबद्दल भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कु. तनवी सुधीर पयेर ही Lip For Word ह्या गोरेगाव (रायगड) येथे झालेल्या स्पर्धा परीक्षेत द्वितीय आली त्याबद्दल भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
मा. श्री. संजय जंजिरकर गुरूजी यांचा विशेष सत्कार गावचे प्रथम नागरिक तसेच नवनिर्वाचित सरपंच मा. श्री. लहुजी तुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, मुख्याध्यापक मा. श्री. सुर्यकांत बिरवाडकर गुरुजी, मा. श्री. संजय जंजिरकर गुरुजी, मा. श्री. महेश पवार गुरुजी, मा. सुधाकर गायकर गुरुजी, नवनिर्वाचित सरपंच मा. श्री. लहू तुरे साहेब, मा. श्री. लक्ष्मण भि. काप साहेब, मा. श्री. दिनेश बामणे साहेब, मा. श्री. हरी पाटील साहेब, मा. श्री. संतोष पाटील साहेब, शिक्षण कमेटी अधक्ष्या मा. सौ. संयुक्ता मासेकर ताई, मा. सौ. सुष्मा धुमाळ ताई, मा. सौ. श्वेता काप ताई, मा. श्री. जगन्नाथ तुरे साहेब, मा. श्री. बाळकृष्ण कातकर साहेब, मा. श्री. अनंत तुरे साहेब, मा. श्री. प्रमोद भुवड साहेब, मा. श्री. शंकर नाईक साहेब, मा. श्री. सुधीर पयेर साहेब, मा. श्री. पंकज भाये साहेब, मा. श्री. जितेंद्र शाह साहेब, कु. विराज नाईक साहेब, मा. श्री. सुधिर भाये साहेब, मा. सौ. मनिषा नाईक ताई, मा. सौ. निलम पाटील ताई, मा. सौ. सुषमा धुमाळ ताई, मा. सौ. जयश्री बिराडी, मा. सौ. वृषाली धुमाळ ताई, मा. लक्ष्मी धुमाळ, तसेच गोल्डन क्रिकेट संघाचे नवनिर्वाचित कर्णधार मा. कु. जितेश भाये, उपकर्णधार मा. श्री. मनिष भुवड, नवनिर्वाचित सेक्रेटरी मा. श्री. गणपत मासेकर साहेब, माजी सेक्रेटरी मा. श्री. संतोष कातकर साहेब, माजी उपसेक्रेटरी मा. श्री. अमित भाये साहेब, सल्लागार मा. श्री. राजेश मासेकर साहेब, मा. श्री. संदेश काप साहेब, सदस्य कु. आपेश पाटील ई. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी मा. श्री. दिनेश बामणे यांनी उत्तम पार पाडली.
उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग, शिक्षण कमिटी, गावकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच जेव्हा जेव्हा आपल्या मराठी शाळेसाठी गरज लागेल तेव्हा आपला संघ नक्कीच शाळेला सहकार्य करेल असे आश्वासन या संघाने आपल्या शाळेसह ग्रामस्थांना दिले.



Post a Comment