म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सपोनी प्रविण कोल्हे यांची नाशिक शहर पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली. अत्यंत कमी कालावधीत कोल्हे यांची बदली झाल्याने राजकीय , सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळीनी हळहळ व्यक्त केली. २९ जून १८ ला कोल्हे यानी म्हसळा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यापासून कोल्हे यानी म्हसळा शहर व तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती, गाव अध्यक्ष, लोक प्रतिनिधी ,राजकीय पदाधिकारी, पत्रकार,पोलीस पाटील या संर्वाजवळ थेट संर्पक व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे गाव, वाडी, शहरांत कोणतीही घटना होण्याच्या पूर्वीच सपोनी कोल्हे याना पूर्वसूचना मिळत असे. त्यामुळे गुन्ह्याची ग्रॅव्हीटी व गंभीरता कमी होत असे. त्याच कारणाने म्हसळा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारीचे स्वरूप व संख्या कमी आहे. अल्प काला वधीत बदली झाल्याने बहुतांश म्हसळा कर नाराज झाले.
"सपोनी प्रविण कोल्हे ह्यानी म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून उत्तम जबाबदारी व कर्तव्य निष्ठेने काम केलेच. ते करत असतानी तालुक्यातील विकास कामे ( माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग) नागरिकांच्या समस्या ( पाणी टंचाई ) यामध्ये अभ्यासू लक्ष घालून " समन्वयक " म्हणून घेतलेली भूमिका म्हसळाक रांसाठी मोलाची होती"
-महादेव पाटील , माजी सभापती व १८ गाव अगरी समाज अध्यक्ष.
Post a Comment