श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून इफ्तार पार्टी चे आयोजन




 लोकशाहीत सामाजिक बंधुत्व प्रगती चे साधन ...बाळकृष्ण जाधव 

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

आपल्या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी लोकशाही बळकट केली आहे .लोकशाही मध्ये सर्वांना समान संधी देण्यात आल्या आहेत. देशातील विविध घटका मध्ये सामाजिक बंधुत्वाची जोपासना करून ऐक्य निर्मिती द्वारे समाजाची प्रगती साधली जाते असे प्रतिपादन बाळकृष्ण जाधव यांनी इफ्तार पार्टी च्या प्रसंगी केले .
श्रीवर्धन पोलीस प्रशासना कडून शहरातील मुस्लिम समाजा साठी इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते .सदरच्या आयोजनासाठी सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी वर्गणी करून इफ्तार चे आयोजन केले होते .त्या प्रसंगी बोलतांना बाळकृष्ण जाधव यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना संबोधित केले .आपण सर्वांनी दिवस भर केलेल्या ईश्वर भक्ती चे फळ आपणांस लाभो .रमजान हा पवित्र महिना मानला जातो .आज आपण सर्वांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात तुमचा उपवास सोडला आहे .ही आम्हा सर्व पोलीस कर्मचारी वर्गासाठी निश्चित आनंदाची बाब आहे.असे जाधव यांनी सांगितले .भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आपल्या कडे दिवाळी व ईद सारख्याच आनंदात साजरे केले जातात . या सण उत्सवा मुळे समाजातील सर्व जाती धर्मात ऐक्याची भावना वाढीस लागते  व त्या तून सामाजिक स्वास्थ्य सदृढ बनते .निरोगी शरीरा प्रमाणे निरोगी सामाजिक स्थिती देशाच्या लोकशाहीत बळकटी प्राप्त करते .आज आधुनिक शिक्षण  व तंत्रज्ञान विकसित झाले आहे .आपण सर्वांनी त्याचा उपयोग करून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला पाहिजे .असे बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले .सदर इफ्तार प्रसंगी मौलाना मुफ्ती महमूद मोमीन यांनी उपस्थित समुदायाला संबोधित करतांना सांगितले देश सेवा ही ईश्वर सेवा आहे .

आपले पोलीस दल देशाच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्यरत असते .त्याच्या मुळे आपण आरामदायी जीवन जगत आहोत .आजच्या कार्यक्रमात सर्व धर्माचे लोक सामील झाले आहेत ही आनंदाची बाब आहे .पोलिस दलाने सर्वांना एकत्र आणून सामाजिक ऐक्याची भावना जोपासली आहे असे मोमीन यांनी सांगितले .सदरच्या इफ्तार पार्टी साठी उपविभागीय पोलीस अधीक्षक बाबुराव पवार ,म्हसळा पोलीस निरीक्षक
प्रवीण कोल्हे  , उपपोलिस निरीक्षक   सुरेश यमगर  , जावेद    मुल्ला , जयेंद्र पेडवी व श्रीवर्धन ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी आणि मुस्लिम समाजातील अनेक तरुण उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा