संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
३२ रायगड लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार श्री अनंत गीते साहेब यांचा झालेला दारुण पराभव व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले प्रचंड मताधिक्क शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जिव्हारी लागले. त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक ०१ जून २०१९ रोजी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची चिंतन बैठकीचे आयोजन म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात आले होते. बैठकीत गावा-गावात शिवसेना बाबतीत असलेली प्रचंड नाराजी व नियोजन, समन्वयाचा अभावामुळे आपल्याला अपयश आले आहे व भविष्यात हा मतदारसंघ परिवर्तन म्हणून भाजपाने लढवावा व शिवसेना नेतृत्वाने याला साथ द्यावी कारण एवढी मोठी लीड भरून विजय संपादन करायचे असल्यास येथे या मतदार संघात भाजपा आणि शिवसेना एकत्रित येऊन एकमताने उमेदवार देऊन भाजपा नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी, देशात व राज्यात भाजपा सरकार असल्याने जनतेमध्ये भाजपा बाबतीत आपुलकी आहे व या मतदार संघात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील राज्य शासनाने केली असून जनतेला बदल अपेक्षित आहे. तरी पक्ष नेतृत्वाने यावर योग्य तो निर्णय देऊन आम्हांला परिवर्तन करण्याची संधी द्यावी असे मत मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा या तालुका अध्यक्ष व अन्य पदाधिकारी याने मांडला . यावेळी श्रीवर्धन विधानसभा ही भारतीय जनता पार्टीच्या वाटयाला यावी असा ठराव श्रीवर्धन मतदार संघाच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी श्री.कॄष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा, श्री.अमित घाग जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, श्री.प्रशांत शिंदे तालुका अध्यक्ष श्रीवर्धन, श्री.शैलेश पटेल तालुका अध्यक्ष म्हसळा, श्री.संजय ढवळे तालुका अध्यक्ष माणगांव, श्री. कैलास पायगुडे तालुका अध्यक्ष तळा, श्री. संजय लोटणकर तालुका सरचिटणीस रोहा आणि श्रीवर्धन यावेळी विधानसभा मतदार संघातील सर्व महिला पदाधिकारी, युवा मोर्चा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment