या 'तिन' तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचे आदेश

या 'तिन' तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचे आदेश

श्रीवर्धन मतदार संघात शिवसेना होत आहे कमकुवत म्हसळयातील चिंतन सभेतील निष्कर्ष ; तिन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचे आदेश 

संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून केंद्रिय मंत्री तथा  शिवसेना नेते अनंत गिते यांचा झालेला पराभव हा शिवसेनेला 
जिव्हारी लागला पराभवाची खापर श्रीवर्धन मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर काढले जात आहे. श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तिन तालुक्यांतील शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांसहीत सर्व पदाधिकाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचा फरमान गिते यांनी काढले आहे. गितेंच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हयातील  व श्रीवर्धन मतदार संघातील शिवसेना कमकुवत होत चालली आहे. 

म्हसळयात शिवसैनीक अनुत्साही

आज म्हसळा तालुका शिवसैनिकांची चितंन बैठक ता. प्रमुख नंदू शिर्के यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संपर्क प्रमुख गजानन शिंदे, उप ता. प्रमुख राजाराम तिलटकर, माजी सभापती महादेव पाटील, अनिकेत पानसरे,वि. प्रमुख अमोल पेंढारी, हेमंत नाक्ती, कौस्तुभ करडे,श्रीमती रिमा महामुनकर, निशा पाटील,जर्नादन बुधे, अमित महामुनकर, शाम कांबळे, बाळकृष्ण म्हात्रे , अनिल महामुनकर , चाळके व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी श्रीवर्धन मतदार संघातून खासदार सुनील तटकरेना मिळालेले ३८,२४७ व म्हसळा तालुक्यातून मिळालेले ९३८० चे मताधिक्क  शिवसैनीकांच्या जिव्हारी लागले , केंद्रात मंत्रीपदी असलेले खासदार गितें पासून, जिल्हाप्रमुख, ता. प्रमुख व आम्ही शिवसैनिक कमी पडल्याचे मत काही युवा सैनीकानी मांडताना, हकालपट्टी केलेल्या शिवसैनीकानी राष्ट्रवादी काँग्रेस वाढविल्याचे आभ्यासू मत मांडले.

राष्ट्रवादी पक्षाला रोखण्यासाठी शिवसैनिक विकासकामे मागत होते तर शिवसेनेचे खासदार कुणबी मतांच्या जोरावर विकासकामे न करता निवडून येण्याचे स्वप्न पाहत होते ही सत्य स्थिती आहे. गिते यांच्या अहंपणाच्या स्वभावामुळे जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी देखील झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेला मतदान करण्याचे टाळले असल्यानेच गिते यांचा पराभव झाला असल्याचे एका वरिष्ठ शिवसैनिकानी सांगितले.
        सहा वेळा खासदार राहीलेल्या शिवसेना नेते अनंत  गिते हे स्वताच्या पराभवासाठी स्वतःच कारणीभूत असताना त्यानी आपल्या पराभवाचे  खापर म्हसळा, श्रीवर्धन व तळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांवर  फोडले असून या तिनही तालुक्यातील तालुका प्रमुखांसहीत सर्व कार्यकारणीला सक्तीने राजीनामा देण्याचे आदेश पराभूत गिते यांनी दिले आहेत. गिते यांच्या या निर्णयामुळे श्रीवर्धन मतदारसंघासहीत संपुर्ण जिल्हयामध्ये शिवसेना पक्ष फुटण्याच्या उंबरड्यावर पोहचला आहे.


म्हसळा तालुकाप्रमुखपद बदलण्याची शक्यता?

माजी केंदीय मंत्री अनंत गिते यांनी आपल्या पराभवाची खापर सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांवर फोडल्याचे समोर येत आहे. यामुळे गिते यांनी तिन तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देखील मागवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या तिन तालुक्यांमध्ये म्हसळा तालुक्याचा क्रमांक वरचा  लागत आहे. तालुक्यात बदल अपेक्षीत असताना पडत्या काळात नव्याने इच्छुक कोणीही नसल्याने विरोधकांजवळ आवश्यकता लागली तर दोन हात करणारे  माजी सभापती महादेव पाटील यांची तालुकाप्रमुख पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा