श्रीवर्धन : भारत चोगले
रायगड जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जाणाऱ्या लालपरीला गळती लागली आहे . मान्सुनपूर्वी वेळेत बसची तपासणी न केल्यामुळे प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत असल्यामुळे प्रवासी वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे मुख्य शहर असून या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय महत्वाची कार्यालये आहेत . त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील खेड्यापाड्यातील नागरिक कोणत्या ना कोणत्या तरी कामा निमित्त दरररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात . परंतु रायगड जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारी बस सेवा ही जुनी असून अनेक वेळा ती जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या जंगलाच्या ठिकाणी अथवा निर्जन ठिकाणी नेहमीच बंद पडण्याचे प्रकारही वारंवार घडत असल्याचे प्रवासी वर्गाकडुन बोलले जात आहे . आता तर दुष्काळात तेरावा महिन्या प्रमाणे प्रवासी वर्गाच्या समस्यांमध्ये अधिक वाढ झालेली दिसत आहे . श्रीवर्धन बसस्थानकामधून सकाळी ५ . ४५ च्या सुमारास श्रीवर्धन अलिबागलालपरीही सुटत असते . एसटीचा प्रवास सुखकर प्रवास म्हणून खेड्यापाड्यातील नागरिक लालपरीने प्रवास करत असतात . परंतु प्रामुख्याने श्रीवर्धन बस आगरातून मान्सुनपुर्व गाड्याच्या योग्यवेळेत तपासणी न केल्यामुळे पावसाचे पाणी हे लालपरीच्या अनेक भागामधून पडत आहे , लालपरीला गळती लागल्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवासी वर्गाच्या अंगावर पडते . तसेच पावसाच्या पाण्याबरोबर पत्र्यांचा काळागंज सुध्दा या पावसाच्या पाण्याबरोबर वाहन येत तो प्रवासी वर्गाच्या कपड्यावर पडून चांगले कपडेही खराब होत आहेत . शिवाय या गळक्या बसमधून प्रवासीवर्गाला अलिबाग सारख्या जिल्हयांच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करावा लागत आहे . काहीवेळा या लालपरीमध्ये प्रवासी वर्गाला छत्री घेऊन बसण्याची वेळ आली आहे . याकडे श्रीवर्धन बसस्थानक आगार प्रमुखाचे डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे . मान्सुनपुर्वी सर्व बसेसची तपासणी करून त्याच प्रमाणे बसच्या टपावर कोठे पत्रा फाटला असेल तर त्या ठिकाणी योग्य अशी उपाय योजना करणे गरजेचे होते . परंतु हे योग्यवेळेत न केल्यामुळे प्रवासी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . याबाबत प्रवासीवर्गाकडून तीव्र नाराजी आहे .
रायगड जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारी बस ही चांगली असावी , अशी अपेक्षा प्रवासीवर्गाची आहे . मात्र गेले काही वर्षे जुन्या गाड्या अलिबाग सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात येत असतात . गाडी जुनी व खराब असल्याने प्रवासीवर्गाला वेळत व सुरक्षित पोहचता येत नाही . या बाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभागाचे प्रमुखांना श्रीवर्धन बसस्थानकामध्ये भेडसावणाच्या अनेक समस्या बाबत माहिती देऊन सुध्दा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहेत . त्यामुळे प्रवासीवर्गाने आता न्याय कोणाकडे मागावा अशी स्थिती रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे . रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी याकडे गांभीयाने दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे .

Post a Comment