म्हसळा ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापकांची वानवा ; माध्यमिक व उच्च माध्यमिकला पुरेसे शिक्षक द्या : युवासेनेची मागणी


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा शहारांतील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेचे न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनी कॉलेज आहे. शाळेमध्ये पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षणाची सुविधा व ज्युनी कॉलेज मध्ये आर्टस- कॉमर्स या फॅकल्टी आहेत. तालुक्यांतील व शहरांतील मध्यवर्ती या शाळे मध्ये किमान २ हजार विद्यार्थी - विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक उपक्रमांत कमी असतानाच मागील वर्षाचे तुलनेत यंदा निकाल कमी आहे.अकरावी व बारावी साठी वाणिज्य शाखेसाठी मागील म्हणजे २०१८ पासून अकाऊंट या विषयासाठी प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. या संदर्भात या शाळेचे माजी विद्यार्थी व शिवसेना युवा अधिकारी अमित म्हामुणकर , प्रसन्ना निजामपूरकर , दिपल शिर्के, राहुल जैन यानी प्राचार्य माळी याना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. वाणिज्य शाखेतील महत्वाच्या अकाऊंट या विषयासाठी गेल्या वर्षभरात शिक्षक नसल्याने वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी फसल्यासारखे झाले आहे. तसेच अन्य काही शाखांतून विषय शिक्षक नाहीत हे म्हसळा करांचे दुर्देव आहे असे म्हटले आहे.राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार व संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना म्हसळा शाखा, शैक्षणिक दर्जा, आर्थिक आनियमीतता, गैरसोयी या बाबत लौकरच प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन देणार आहोत असे महामुनकर यानी आमचे प्रतिनीधी जवळ सांगितले .

"आम्ही स्थानिक पातळीवर तासिका स्वरूपावरती शिक्षक नेमण्याचे आदेश संबधित .दिले आहेत परंतु शिक्षक उपलब्ध होत नाहीत. नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया शासनाने थांबवली आहे.तरी देखील मी संस्थेची सचिव म्हणून येत्या काही दिवसात शिक्षक देण्याची तरतुद करते "
सौ.शुभांगी गावडे ,सचिव स्वामीविवेकानंद शिक्षक संस्था कोल्हापूर

"मी प्राचार्य म्हणून संस्थेच्या आदेशानुसार ग्रामीण पातळीवरती वाणिज्य शाखेचा शिक्षक मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु को शिक्षक उपलब्ध झाले नाही प्रयत्न सुरु आहेत.न्यु इंग्लिश स्कुल म्हसळा"माळी सर , प्राचार्य,न्यु इंग्लिश स्कुल म्हसळा

संस्थेच्या म्हसळा शाखेचा शैक्षणिक कारभार बेताचाच आहे. माध्यमिक व ज्युनी. कॉलेजला आवश्यक शिक्षक, प्राध्यापक नसले तर विद्यार्थी पालक आंदोलनाचा पवित्रा घेतील."
अमित महामुनकर, माजी विद्यार्थी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा