म्हसळ्यात शासकीय विश्रामगृहांची दुरवस्था ; तळवडेत विश्रामगृह जमीनदोस्त , दुस - या विश्रामगृहात चौकीदारच नाही
म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन शासकीय विश्रामगृह असून त्यापैकी तळवडे येथील शासकीय विश्रामगृह हे जमीनदोस्त झाले आहे तर दुसरे विश्रामगृह हे म्हसळा तालुक्यात असून त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष चौकीदार नाहीत अशी स्थिती आहे . म्हसळा तालुक्यात विश्रामगृहाची आवश्यकता असताना जे सध्या विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाला मुळात चौकीदार नाही . त्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावरील दुरूस्तीत काम करणा - या लेबरांना त्या विश्रामगृहात दिवस रात्र काम करावे लागत आहे . त्यातच येत्या जून मध्ये रस्त्यावरील कर्मचा - यांमधील सात कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने त्या विश्रामगृहात काम करणार कोण ? असा सवाल निर्माण होत आहे . विश्रामगृहाची देखभाल सुविधा करणार कोण करणार , एका बाजूला चौकीदार नाहीं तर दुसया बाजूला काम करणारे लेबर सेवानिवृत्त होणार आहेत . सेवानिवृत्त कर्मचारी मे महिन्यात २ व जून महिन्यात ५ असे एकूण ७ कर्मचारी निवृत्त होणार आहेत . यामुळे म्हसळा विश्रामगृहाला वाली कोण ? त्याचप्रमाणे तळवडे येथील शासकीय विश्रामगृह गेल्या दहा - बारा वर्षापासून जमीनदोस्त झाले आहे , याकडे कोणतेही शासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते ढुंकून देखील पाहत नाही , म्हसळा तालुक्यासाठी शासकीय विश्रामगृह दोन असताना एक जमीनदोस्त तर दुस - यात चौकीदार नाही अशा स्थितीमध्ये असलेले शासकीय विश्रामगृह ३० जूनला पोरके होणार आहे . तालुक्याला एकच असणारे शासकीय विश्रामगृह ते देखील बंद होणाच्या मार्गावर असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व संबधीत खात्याचे मंत्री हे लक्ष देतात की नाही हे पाहणे तेवढेच गरजेचे ठरणार आहे .
आपण संबधीत विश्रामगृहाविषयी शासनाकडे कळविले आहे. महाड सार्वजनिक विभागाकडील अनेक विश्रामगृह चौकीदारांमुळे बंद आहेत. त्याचाही अहवाल आपण वरिष्ठांकडे सादर केला आहे . म्हसळा तालुक्यातील शासकीय विश्रामगृहाचा प्रश्न देखील समोर आहे. विश्रामगृह चौकीदाराअभावी बंद ठेवावे लागेल असे वाटते.
कार्यकारी अभियंता महाड .
Post a Comment