संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात पावसानी बळीराजाला हुलकावणी दिली. पाऊस व्यवस्थीत लागला तर आवणाची वाढ होईल व आपण लावणी सुरु करु या आशेने शेतकरी उखळ ( मशागत )करू लागला पण सतत पाचव्या दिवशी पावसाना म्हसळा व रायगड जिल्ह्याकडे पाठ फिरवील्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला , पावसाची साधी उघडीप सुद्धा नसल्याने बळीराजाचा नांगर
शेतात रूतल्याचे चित्र आहे.
देशात आणि राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिशय लांबलेला मान्सून अखेर राज्यात दाखल झाला आहे परंतु त्याचा जिल्हयांत काहीही परिणाम झाला नाही . येत्या ४ दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होणार आहे. दरवर्षी प्रमाणे जून च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ७-८ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येतो मात्र मधील काळात वायू चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठीचे पोषक असणारे वातावरण तयार झाले नाही. यामुळे वातावरणातील आर्द्रता निघूल गेल्याने मान्सूनचा प्रवास खंडित झाला होता. मात्र पुन्हा मान्सूनसाठीचे पोषक वातावरण तयार झाले आसल्या बाबतचा निर्वाळा हवामान खात्याकडून मिळत आहे.कोकणात मान्सूनचा मुसळधार पाऊस २२-२३ जून पर्यंत हजेरी लावणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील २० वर्षात प्रथमच मान्सून एवढ्या उशिरा दाखल झाला आहे. असे असून देखील पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या दिवसांत मान्सून पावसाची दरवर्षीची सरासरी पाऊस भरून काढेल अशी चिन्हे आहेत. गोवा वेधशाळेने सुद्धा मान्सूनची अधिकृत घोषणा केली आहे. मच्छिमारांना दक्षतेचा इशारा देत समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात न जाण्याच्या सूचना वेधशाळेने दिल्या आहेत.तरी बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते .
सतत पाच दिवस पावसाने पाठ फिरवल्यामुळे आवणाची वाढ खुंटली आहे , ते पिवळे ही पडत आहे. येत्या २ दिवसांत मान्सून सक्रीय न झाल्यास शेतकऱ्याचे नुकसान होईल.एकरी उत्पन्नावर परिणाम होईल.
-महादेव म्हात्रे, खारगांव ( खु)

Post a Comment