श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन शहरातील रास्त धान्य दुकाना समोर खरेदी साठी सर्वसामान्य लोकांची गर्दी निदर्शनांस येत आहे .महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक निर्गमित झाले परंतु जनतेत त्या विषयी जागृती नसल्याचे चित्र श्रीवर्धन मध्ये निदर्शनांस येत आहे . या पुर्वी सरकारमान्य विक्री केंद्रात धान्य विक्री साठी महिन्यातील अथवा दोन आठवड्यातील ठराविक दिवस विक्रेत्या कडून निश्चित केले जात त्या वेळी सर्वसामान्य जनतेचे प्रचंड प्रमाणात हाल होत असत . सदरची बाब विधान सभेत उपस्थित झाल्या नंतर नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आले .
श्रीवर्धन शहरातील सरकार मान्य स्वस्त धान्य विक्रीच्या दुकाना समोर रात्री पर्यंत महिलांची गर्दी निदर्शनांस आली आहे .या वरून धान्य वितरकांना नवीन परिपत्रका विषयी ज्ञान नसल्याचे दिसून येत आहे .रेशनकार्ड वर उपलब्ध होणाऱ्या
धान्यासाठी महिलांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येते .घरातील काम धंदा बंद ठेऊन वेळ प्रसंगी रोजगार बुडवून स्वस्त धान्या साठी जनतेला यावे लागते ही बाब निश्चित चिंताजनक आहे .
स्वस्त धान्य विक्रेत्यांचे सर्वसामान्य व्यक्तीला देण्यात येणारी वागणूक ही "परोपकार 'केल्याच्या भावने प्रमाणे असल्याचे दिसून येत आहे .रेशनकार्ड ची आदळ आपट ,उर्मट भाषाशैली यांचा वेळोवेळी सामान्य माणसाला प्रत्यय येत आहे .परंतु आपण ग्राहक आहोत व आपण खरेदी करत असलेला माल हा सरकारी आहे .आपणांस स्वस्त दराने सरकार माल देत आहे विक्रेता नाही याचे ज्ञान सामान्य व्यक्तीला नसल्याने विक्रेत्याची अवहेलनात्मक वागणुक सामान्य जनतेला सहन करावी लागत आहे .
श्रीवर्धन शहरात चार व तालुक्यात 41 स्वस्त धान्य दुकाने आहेत .
सदरच्या दुकांनाचा चालू व बंद होण्याचा कोणताही वेळ अद्याप धान्य पुरठवा विभागाने निश्चित केल्याचे दिसून येत नाही . त्याकारणे जनतेचे धान्य खरेदी प्रसंगी हाल होत आहेत . श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या सुमारे 76 हजारच्या जवळपास आहे श्रीवर्धन तालुक्याला प्रत्येक महिन्याला जवळपास 1500 क्विंटल धान्य साठा सरकार कडून पुरवठा करण्यात येतो .
श्रीवर्धन हा दुर्गम तालुका असून .आज ही अनेक गावांत एस टी व्यतिरिक्त वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध झालेला नाही .मेघरे , बापवली ,गुलदे ,साखरी ,वावे , आडी , गडबवाडी ,नानवेल , वांजळे ,आसुफ ,खूजारे ,खेर्डी ,हुन्नरवेली ,जावेळे ,कुरवडे ,निगडी या गावात स्वस्त धान्य दुकान नाही .त्या कारणे सदरच्या गावातील लोकांना सुमारे 10 ते 12 किमी जाऊन धान्य खरेदी करावी लागत आहे .गाव तेथे स्वस्त धान्य विक्रीच्या दुकांनाचा शासना ने निर्णय घेतल्यास निश्चित वयोवृद्ध व्यक्ती व महिलांच्या दृष्टीने अतिशय चांगले ठरेल .

Post a Comment