म्हसळा : सुशील यादव
सालाबाद प्रमाणे साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे जेष्ठ शुद्ध त्रयोदशी दिनांक १५ जून २०१९ रोजी हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत किल्ले रायगड येथे साजरा करण्यात आला. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे गडावर अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असते. सूमारे शेकडो कार्यकर्ते म्हसळा तालुक्यांतून शिवराज्याभिषेकाला आदल्या दिवशी म्हणजेच जेष्ठ शुद्ध द्वादशीला (१४ जून २०१९) म्हणजेच संभाजी महाराजांची जयंती साजरी यावर्षी रायगडावर साजरी करण्यात आली होती. गडावर पर्जन्यवृष्टी होत असून देखील महिला, मुली व बालकानी मोठ्या प्रमाणात शिवराज्यभिषेकाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी गड उतरताना गडावरील वाटेवर असणारा प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्याचे प्रेरणादायी कार्य केले. प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी म्हसळा तालुक्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यामध्ये शिवजयंतीला किल्ले रायगडावरून मशालज्योत आणणे आणि शिवपालखी मिरवणूक काढणे, सायकल रॅली, सार्वजनिक दहीहंडी उत्सव, मराठी राजभाषा दिन साजरा करणे, दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा, मान्यवरांचे व्याख्यान असे अनेक उपक्रम वर्षभरात आयोजित करण्यात येत असतात.
यासाठी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सचिन करडे, राजेश करडे, युवराज करडे, प्रणय साळवी, शूभम करडे, श्लोक करडे, अनिकेत तांबट, समृद्धी सुकाळे, पंकज पोतदार, सेजल करडे, भालचंद्र करडे, सुनिल होशाले आदींनी मेहनत घेतली.

Post a Comment